महाअपडेट टीम, 7 फेब्रुवारी 2022 : PM Kisan e-KYC : तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना न करता मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना 2022 साठी, तुम्हाला तुमचे ई-केवायसी (e-KYC) त्वरित पूर्ण करावे लागणार आहे. याशिवाय तुमचा हप्ता लटकू शकतो. सरकारने आता (e-KYC) करणं बंधनकारक केलं आहे. e-KYC करणं काही दिवसांसाठी होल्डवर होतं, पण आता ते पोर्टलवर ओपन करण्यात आलं आहे.
मोदी सरकारने पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) आधार अनिवार्य केलं आहे. पोर्टलवर आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी (Authentication) किसान कॉर्नरमधील eKYC ऑप्शनवर क्लिक करा. आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी (Authentication) जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. तसं, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने हे साध्य करू शकता.
यासाठी तुम्ही प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा…
उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.

आता तुमचा आधार क्रमांक( Aadhaar) आणि इमेज कोड (Image code) टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका.
जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल.

असे झाल्यास तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करून घेऊ शकता.