Take a fresh look at your lifestyle.

खडकाळ जमिनीत ज्येष्ठ शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग ! ऊसाचे एकरी घेतले 138 टन उत्पादन, पहा असे केले ऊस लागवडीचे नियोजन..

0

86 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या खडकाळ जमिनीत तब्बल 138 टन एकरी उसाचे उत्पादन घेऊन तरुण शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. जैनुद्दीन साहेबलाल मुजावर असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे पणदरे गटातील ज्येष्ठ सभासद असलेले जैनुद्दीन मुजावर यांची सोनकसवाडी (ता. बारामती) येथे खडकाळ जमीन आहे. पण, जिद्द व कष्टाच्या जोरावर या खडकाळ जमिनीत नंदनवन फुलविण्याची किमया त्यांनी केली आहे. त्यांनी सोनकसवाडी येथील गट नं. 105 मध्ये आपल्या एक एकर शेतीत तब्बल 138 टन एकरी उत्पादन घेतले आहे. यामुळे ते कौतुकास पात्र ठरले आहेत. त्यांनी आपल्या शेतात 4.5 फूट व दीड फूट रुंदीच्या पट्टा पद्धतीने को 86032 या ऊस जातीची एक डोळा पद्धतीने लागवड केली.

लागवड करण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण शेताची मशागत करून शेणखत मोठ्या प्रमाणात वापरले. लागवडीनंतर उसाची उगवण झाल्यानंतर रासायनिक खते, कोंबडखत यांचा योग्य वापर केला. यानंतर ऊस खुरपणी बांधणी केली. तसेच ठिबक सिंचनाने पाणी दिले.

वेळोवेळी माळेगाव कारखान्याचे शेतकी अधिकारी सुरेश काळे, गणेश कृषी केंद्र, नीलेश कृषी केंद्र यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे पीक जोमदार आले. पिकाची योग्य काळजी घेतल्याने उसाचे कांडे 42-45 पर्यंत वाढले. यामुळे एकरी 138 टन ऊस उत्पादन घेता आले. दरम्यान या प्रकरणी माळेगाव कारखान्यात ॲड संजय जगताप (एकरी 138 टन) व सोमनाथ नवले (पावणेदोन एकरात 195 टन) यांनी एकरी ऊस उत्पादन घेतले आहे.

या यशाबद्दल कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, ज्येष्ठ संचालक तानाजी कोकरे यांनी जैनुद्दीन मुजावर यांचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.