दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान ! पण कसे मिळणार, शेतकऱ्यांनी अर्ज कुठे आणि कसा करावा? पहा A टू Z माहिती..

0

राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर राज्य सरकारकडून 5 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ व खासगी दूध प्रकल्प यांनी स्वंतंत्र अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी केले आहे.

फॅट व एसएनएफ ३.५ / ८.५ या गुणप्रतिपेक्षा पॉइंट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफकरिता प्रत्येकी ३० पैसे वजावट करण्यात येईल. तसेच प्रती पॉइंट वाढीकरिता ३० पैसे वाढ करण्यात येणार आहे.

शासनाने जाहीर केलेल्या रुपये ५ प्रतिलिटर दुधास अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी सहकारी दूध संघ व खासगी प्रकल्पांनी आयुक्त दूग्ध व्यवसाय विकास विभाग, मुंबई यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

या योजनेसाठी अर्ज करताना सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पकांकडून कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे.

त्यानुसार सहकार, मल्टीस्टेट दूध संघासाठी संघाच्या लेटर पॅडवर अर्ज
ठराव
सहकारी संघाचे नोंदणी प्रमाणपत्र,
या अर्जासोबत एफएसएसएआयचे प्रमाणपत्र,
संचालक मंडळाची यादी

खासगी दूध प्रकल्पांसाठी ही कागदपत्रे आवश्यक..

खासगी प्रकल्पाच्या लेटर पॅडवर अर्ज किंवा ठराव किंवा पावर ऑफ ऍटर्नी
औद्योगिक विभागाचे कारखाना नोंदणी प्रमाणपत्र
एफएसएसएआयचे प्रमाणपत्र ,
बोर्डाची यादी, इ. कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे.

या अनुदान योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दूध संघ व खासगी दुध प्रकल्प यांनी डिबीटी करण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डसोबत व पशुधनाच्या कानातील बिल्याशी (ईएआर टॅग) संलग्न ( लिंक) करणे आवश्यक आहे.

या दूध उत्पादकांना मिळणार लाभ..

या योजनेत दुध दत्पादक शेतकरी दुध सघास खाजगी दुध प्रकल्पास दूध पुरवठा करतात ते शेतकरी सहकारी संघ किंवा खासगी प्रकल्पामार्फत सहभागी होवू शकतात. या योजनेचा कालावधी ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत राबविण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्प यांनी आपला स्वतंत्र अर्ज माहितीसह इमेल आयडीवर सादर करावा, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. जया राऊत यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.