देशातील सर्वात लांब समुद्रात बांधलेल्या अटलबिहारी वाजपेयी न्हावा शेवा अटल पुलाचे (MTHL) प्रवाशांसाठी खुला झाला आहे. हा पूल सुरू झाल्याने उरण – उलवे परिसरात तिसरी मुंबई स्थापन करण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले की, या परिसराचा सर्वांगीण विकास सहज शक्य होणार आहे.

22 किमी लांबीच्या या पुलामुळे मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांवर संपूर्ण देश लक्ष ठेवून आहे. 2014 पूर्वी पायाभूत सुविधांसाठी मुंबईचे 12 लाख कोटी रुपयांचे बजेट होते, ते आता 44 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे, त्यामुळे मुंबईच्या आजूबाजूच्या परिसराचाही कायापालट होणार आहे.

रायगड होणार इकॉनमिक हब..

असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत मुंबईने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र अटल सेतू सुरू झाल्यानंतर रायगड देशाचे नवे इकॉनमिक हब बनेल. देशातील सुमारे 65 टक्के डेटा सेंटर रायगडमध्ये होणार आहे. नवी मुंबई विमानतळासह अन्य सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे येथे प्रचंड विकास होणार आहे.

MMR ला लवकरच पहिला रिंग रोड मिळणार आहे, ज्यामुळे अवघ्या 1 तासात प्रत्येक कोपऱ्यात पोहोचणे शक्य होणार आहे. 1973 मध्ये या पुलाचा विचार करण्यात आला होता, परंतु बांधकाम सुरू होऊ शकले नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर MTHL च्या बांधकामाला वेग आला आणि सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या. त्याचाच परिणाम म्हणून 22 किलोमीटर लांबीचा पूल आज वाहनांसाठी खुला करण्यात आला. आता मुंबईहून नवी मुंबईत अवघ्या 20 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.

एका झटक्यात 15 लाखांचा फ्लॅट 70 ते 80 लाखांना !

MTHL प्रकल्पामुळे रायगड मधील उरण पेण, पनवेल मधील जमीनीचे दर मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. याबाबत रियल इस्टेट एजंट योगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, सध्या सुरु झालेला MTHL प्रोजेक्ट, नेरूळ ते उरणचा दुसरा टप्पा खारकोपर ते उरण, प्रस्तावित आयटी पार्क यामुळे परिसरातले भूखंड आणि फ्लॅटचे दर गगनाला भिडले असून आता 13 लाखांच्या फ्लॅटला तब्बल 70-80 लाखांपर्यंत रक्कम मोजावी लागत आहे.

बातमी : तिसरी मुंबई : ‘या’ 2 तालुक्यांतील 23 गावांसाठी तब्बल 12,000 कोटींचा खर्च, ‘या’ ठिकाणी जमिनी खरेदीची मोठी संधी..

अटल सेतूचे महत्त्वाचे मुद्दे..

1962 : मुंबई ते नवी मुंबई जोडणारा सागरी सेतू प्रथमच मांडण्यात आला.

2016 मध्ये : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुलाची पायाभरणी केली. एप्रिल 2018 मध्ये काम सुरू झाले.

येथून दररोज 70 हजार वाहने ये – जा करतात असा अंदाज आहे. येथे सुमारे 400 कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

अटल सेतू सुमारे 18,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे उशीर झाला आणि खर्चही वाढला.

16.5 किमी लांबीचा अटल पूल समुद्रावर आणि सुमारे 5.5 किमी जमिनीवर बांधला गेला आहे.

हाँगकाँगचा झुहाई मकाऊ ब्रिज, त्याची लांबी 55 किमी आहे, हा जगातील सर्वात लांब सागरी पूल आहे. अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *