पुणे Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- हवेली तालुक्यातील पेठ गावातील विकास कामासाठी निधी कमी पडुन देणार नाही, अशी ग्वाही शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार यांनी दिली.
हवेली तालुक्यातील पेठ गावात ग्रामपंचायत , जिल्हा परिषद, पंचायत समिती हवेली व आमदार निधीतून विविध विकासकांमाचे भूमीपूजन व उद्घाटन शिरूर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पेठ गावचे सरपंच सुरज चौधरी यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे विविध विकास ठप्प झाली होती. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे पेठ येथेविकासकामांचा सपाट लावण्यात येणार आहे.
गावाच्या विकासासाठी आमदार अशोक पवार यांचे योगदान मोठे आहे. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याचे पाणी योजना, सुरेश आण्णा वस्ती मधील साकव पुलाचे उद्घाटन, धोबी घाट उद्घाटन, विष्णुनगरमधील अंतर्गत सिमेंट रस्ता भूमीपुजन, पेठगावातील वडाचीवाडीते शिवाजी चौधरी रस्ता सिमेंट काँक्रेटीकरण करणे, विष्णुनगर ते पेठगाव 18 इंची ड्रेनेज लाइन भूमीपुजन आदी कांमाचे उद्घाटन व भूमीपुजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन, सरपंच सूरज चौधरी, उपसरपंच विजया चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, जे. बी. चौधरी, रघुनाथ चौधरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुळशीराम चौधरी, चेअरमन सोमनाथ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य तानाजी चौधरी व सर्व सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या सदस्या किर्ती कांचन यांनी सांगितले की, करोनाच्या काळात निधी मिळाला. नाही. पेठ गावासाठी जास्तीत निधी उपलब्ध करुन देऊ , सरपंचाच्या कामाची पद्धत चांगली असुन ते सातत्याने एखाद्या कामाचा पाठपुरावा करतात. कराना काळात सरपंच सूरज चौधरी यांचे काम खूपच प्रशंसनीय असल्याचे किर्ती कांचन यांनी यावेळी सांगितले.