महाअपडेट टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेलया विधान परिषद जागेची निवडणुकीत दिवंगत कॉंग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपचे उमेदवार संजय केणेकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला. याबाबतच्या वृत्ताला भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विधान परिषदेसाठी प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड व्हावी म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती.
उमेदवार म्हणून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आला आहे. प्रज्ञा सातव या बिनविरोध विधान परिषदेवर जाव्यात यासाठी काँग्रेसकडून धडपड सुरू आहे.
या पार्श्वभुमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ आता मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीमुळेच देवेंद्र फडणवीस यांनी ती विनंती मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.