Take a fresh look at your lifestyle.

Share Market : फक्त एका महिन्यात ‘या’ 5 शेयर्सने 1 लाखांचे केले 2.75 लाख ; गुंतवणूकदार झाले मालामाल !

0

महाअपडेट टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- एकतर आपले पैसे सुरक्षित असणे अन् दुसरं म्हणजे चांगलं उत्पन्न मिळणं. या दोनचं गोष्टी गुंतवणूकदारांसाठी दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शेअर मार्केटमध्ये चांगले रिटर्न्स अपेक्षित आहे, परंतु पैशाची सुरक्षितता तेवढी वाटतं नाही. परंतु जर तुम्ही माहिती मिळाली, संशोधन केलं आणि नंतर सर्वोत्तम निवडलेल्या कंपनीत पैसे गुंतवले तर तुम्हाला प्रचंड नफा मिळू शकतो.

तज्ञ मंडळी नेहमी सांगत आलेत की, तुम्ही त्या कंपनीत पैसा गुंतवावा ज्या कंपनीत वाढ होणे अपेक्षित आहे, आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा 5 कंपन्यांची माहिती देणार आहोत, त्यांनी 1 महिन्यात गुंतवणूकदारांना 175 % रिटर्न्स दिले आहेत आणि भविष्यातही या कंपन्यांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे.

3 आय इन्फोटेक (3I Infotech) :-

3i इन्फोटेकचे मार्केट कॅप सध्या 1,405.86 कोटी रुपये आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरने 175.20 % रिटर्न्स दिले आहेत. एका महिन्यात शेअर 31.45 रुपयांवरून 86.55 रुपयांपर्यंत वाढला आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर जवळपास 5 टक्क्यांच्या मजबूतीसह बंद झाला. 175.20 टक्क्यांच्या रिटर्न्स सह, गुंतवणूकदारांचे 1 लाखाचे 2.75 लाखांपेक्षा जास्त झाले आहे.

डिगजॅम (Digjam) :-

डिगजॅम (DigJam) हा देखील अशा शेयर्स पैकी एक आहे ज्याने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न्स दिले आहे. या कंपनीचा शेअर 20.97 रुपयांवरून 57.60 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच डिगजॅमच्या शेअर्समधून गुंतवणूकदारांना 174.68 टक्के रिटर्न्स मिळाले. या कंपनीचे मार्केट कॅप 11.52 कोटी रुपये आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

राधे डेव्हलपर्स (Radhe Developers) :-

राधे डेव्हलपर्सच्या शेअर्सने एका महिन्यात 140.04 % रिटर्न्स दिले आहेत. त्याचा स्टॉक एका महिन्यात 111.75 रुपयांवरून 268.25 रुपयांपर्यंत वाढला. या कंपनीचे मार्केट कॅपिटल 675.45 कोटी रुपये आहे. या कंपनीचा 52 आठवड्यांचा शिखर 268.25 रुपये आहे. त्याचा शेअर गुरुवारी 5 % च्या वाढीसह बंद झाला.

ऑक्टल क्रेडिट (Octal credit) :-

यादीत पुढे ऑक्टल क्रेडिट आहे. या कंपनीच्या शेयर्सनी बीएसईवर BSE एका महिन्यात 139.05 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. या काळात कंपनीचा शेअर 45.45 रुपयांवरून 108.65 रुपयांपर्यंत वाढला. त्याचा शेअर गुरुवारी 5 % च्या वाढीसह 108.65 रुपयांवर बंद झाला. या टप्प्यावर कंपनीचे बाजार भांडवल 54.33 कोटी रुपये आहे.

मॉडेला वुलन्स (Modella Woolen) :-

गेल्या एका महिन्यात मॉडेला वूलन्सचा शेअर 19.06 रुपयांवरून 45.45 रुपयांवर गेला आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना 138.46 टक्के परतावा मिळाला. गुरुवारी कंपनीचा शेअर 4.14 टक्क्यांनी वाढून 45.45 रुपयांवर बंद झाला. या किंमतीत कंपनीचे बाजार भांडवल 4.14 कोटी रुपये आहे. गेल्या 52 आठवड्यात कंपनीचा शेअर 45.45 रुपयांपर्यंत चढला आणि 7.96 रुपयांपर्यंत खाली आला. आदी इंडस्ट्रीज, गोपाल आयरन आणि सिम्प्लेक्स पेपर्ससह अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना एका महिन्यात 130 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.

गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये काय घडलं ?

गेल्या आठवड्यात, BSE सेन्सेक्स 1,050.68 अंकांनी किंवा 1.73 % नी घसरून 59,636.01 वर बंद झाला, तर निफ्टी 50 337.95 अंकांनी किंवा 1.87 टक्क्यांनी घसरून 17,764.80 वर बंद झाला. बीएसई मिडकॅप (BSE) 1.71 % आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.5 टक्क्यांनी घसरले. ऑटो वगळता सर्व प्रमुख क्षेत्र लाल चिन्हाने बंद झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.