शेतीशिवार टीम, 5 डिसेंबर 2021 : शासन स्तरावर पायाभूत विकास, आरोग्य, कृषी अशा स्वरुपातील विविध योजना असतील इतक्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. पुढील काळात पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे मत शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले आहे.
कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील सुमारे 2 कोटी 11 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व नवीन कामांचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते रविवारी (ता.5 ) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जि. प. सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य संतोष कांचन, कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल शितोळे, पेठचे सरपंच सुरज चौधरी, योगेश शितोळे, राजेंद्र कांचन, सागर कांचन, आण्णा महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ चौधरी, उपसरपंच लीलावती बोघे, सुभाष टिळेकर, पोलीस पाटील वर्षा कड उपस्थित होते.
कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत साकव बांधणे – 35 लाख, इनामदार वस्ती येथील शाळाग्रह व खोल्या बांधणे -22 लाख 50 हजार, दावसे- कड वस्ती नंबर 2 रस्ता – 15 लाख, अंतर्गत रस्ते मुरमीकरण करणे – 15 लाख, गावठाण सिमेंट रस्ता 15 लाख, कड वस्ती ते शितोळे वस्ती रस्ता 10 लाख, कोरेगाव मुळ ते कडवस्ती अंतर्गत खडीकरण 10 लाख, कोरेगाव मुळ ग्रामपंचायत कार्यालय समोर पेविंग ब्लॉक बसविणे 10 लाख,
कोरेगाव मुळ अंतर्गत रस्ते करणे 20 लाख, कोरेगाव मूळ अंतर्गत रस्ता खडीकरण करणे 20 लाख, चौरंग मळा येथे बंदिस्त गटार बांधणे- 20 लाख, भन्साळी वस्ती ते शितोळे वस्ती रस्ता बांधणे – 8 लाख, तांडावस्ती ते बोधे वस्ती रस्ता 8 लाख, अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीत नळ पाणीपुरवठा करणे 5 लाख 67 हजार, तांडा वस्ती येथे ड्रेनेज 5 लाख,
समाज मंदिर बांधणे 5 लाख, ओढा बंदिस्त गटार बांधणे -2 लाख 50 हजार, मागासवर्गीय लाईट सुविधा करणे 2 लाख 50 हजार, अंगणवाड्या डिजिटल करणे – 2 लाख, शेतमाल ने-आण करण्यासाठी रस्ता तयार करणे – 2 लाख, असा सुमारे 2 कोटी 11 लाख 17 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.