शेतीशिवार टीम, 5 डिसेंबर 2021 : अ.नगर जिल्हा भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी युवा मोर्चाची अ.नगर येथे बैठक पार पडली या बैठकीत अ.नगर जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष अशोक गाडे यांनी नुकतीच जाहीर केली भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरूण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ.नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षवाढीसाठी तन मन धनाने काम करणारे पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करणार्या कार्यकर्त्यांना जिल्हा कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील ग्रामीण भागातील विद्यमान उपसरपंच किरण पाटील अंञे यांची अ.नगर भाजपा ओबीसी युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना श्री किरण पाटील अंञे म्हणाले की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे व ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक गाडे यांचा आभारी असुन येणार्या काळाच पक्षाचे विचार आचार ध्येय धोरणे तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहील.
समाजातील वंचित दलित बहुजन यांच्या हक्कासाठी कार्यरत राहु. जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री अंञे यांना नगर दक्षिणचे खासदार सुजयदादा विखे पाटील, माजी मंञी राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डीले साहेब,जिल्हा परिषदेच्या मा अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,प्रवरा कारखान्याचे व्हा चेअरमन विश्वासराव कडु,जिल्हा अध्यक्ष अरूण मुंडे, अशोक गाडे, संचालक सुभाष पाटील अंञे, राहुरी तालुका अध्यक्ष अमोल भनगडे, मच्छीद्र अंञे,राजेंद्र अनाप,नारायण धनवट, विनोद अंञे,सरपंच अनिल अनाप यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थानी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.