शेतीशिवार टीम, 5 डिसेंबर 2021 : वाडा पुनर्वसन येथे नुकतेच 28 लक्ष रुपये खर्चातून केलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्याचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. नागरिकचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच जनता दरबार भरवून सर्वांचे प्रश्न सोडविणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तसेच कोरेगाव – भीमा व वाडा पुनर्वसन गावासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी 17 कोटी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार अशोक पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कामासाठी मिळालेल्या निधीतून ते काम योग्य प्रकारे होत आहेत का नाही याची जबाबदारी ठेकेदार सह नागरिकांची ही असून गुणवत्ता नसलेले काम तात्काळ बंद करावेत अशा सूचनाही यावेळी आमदार अशोक पवार यांनी दिल्या. वाडा पुनर्वसन ग्रामंचायती च्या वतीने आमदार अशोक पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व आभार मानण्यात आले.
यावेळी सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, महानगर नियोजन समिती सदस्य यशवंत गव्हाणे, घोडगंगासाखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे,
माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, सरपंच नवनाथ माळी, उपसरपंच सुरेखा ढोरे, माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन ढोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उषा भोकटे तसेच वाडा पुनर्वसन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.