जॅकलिन ED च्या रडारवर ; जॅकलिनने 10 कोटींच्या भेटवस्तू तर, नोरा फतेहीने BMW सह घेतला आयफोन ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…
शेतीशिवार टीम, 6 डिसेंबर 2021 : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन रविवारी मुंबई एयरपोर्ट वर पोहोचली, तेथून ती विदेशी फ्लाइट पकडणार होती. पण तिला देशाबाहेर जाण्याची परवानगी मिळाली नाही. ईडीने जॅकलीनविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर ईडीने तिला ताब्यात घेतलं.
200 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव ईडीच्या चार्जशीट मध्ये समाविष्ट आहे. शनिवारी दाखल केलेल्या सुमारे 7000 पानांच्या चार्टशीटमध्ये या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिनला 10 कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले आहे.
यामध्ये दागिने, हिरे, 36 लाख किमतीच्या चार पर्शियन मांजरी आणि 52 लाख किमतीच्या घोड्याचा समावेश आहे. सुकेश तुरुंगात असताना तो जॅकलिनशी फोनवर बोलत असे.
काही काळापूर्वी जॅकलिन आणि सुकेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये दोघे एकमेकांच्या अगदी जवळ दिसून येत आहे :-.
याशिवाय नोरा फतेहीचे नावही समोर आले आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी नोरा फतेहीला बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिल्याचे चार्टशीटमध्ये उघड झाले आहे. त्याची एकूण किंमत एक कोटी रुपयांहून अधिक होती.
वास्तविक, सुकेश चंद्रशेखर यांच्या 200 कोटी वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचं विधान रेकॉर्ड करण्यात आला होता. एजन्सी याबाबत दोघींची सतत तपासणी करत आहे.