BREAKING : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। शिंदे गटाला मोठा धक्का, तर ठाकरे गटाला मिळालं हे नवं चिन्ह आणि नाव

0

शेतीशिवार टीम : 10 ऑक्टोबर 2022 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर दोन गटात विभागलेली शिवसेना एका चौरस्त्यावर उभी आहे. दोन्ही गट प्रथमच धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दोन्ही गटांनी निवडणूक चिन्हांचे प्रत्येकी 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. 

उद्धव गटाने मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ, तर शिंदे गटाने तुतारी, गदा आणि तलवार यापैकी एक चिन्ह देण्याची विनंती केली होती परंतु ऐनवेळी त्यांनीही गदा, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांवर दावा ठोकला.

नावांसाठी ठाकरे गटाने आपल्या तीन पिढ्यांची नावे वापरून निवडणूक आयोगाला पर्याय दिले होते. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रबोधनकार ठाकरे असे 3 पर्याय उद्धव ठाकरे गटाने दिले होते.

एकीकडं निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दोन्ही गटांना आशा आहे की धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच भेटण अशा आशेवर ठाम आहे.

परंतु, या दरम्यान निवडनुक आयोगाने अजून एक मोठा निर्णय घेत उद्धव ठाकरेंना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे, तर एकनाथ शिंदेंना धक्का देणारा निर्णय घेतला आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उद्धव गटाला ‘मशाल’ चिन्ह दिलं आहे. निवडणुकीसाठी कोणतेही धार्मिक चिन्ह देता येणार नाही, असे आयोगाने म्हटलं आहे. उद्धव गटाने मशाल, त्रिशूल आणि उगवत्या सूर्याचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवला होता. शिंदे गटाने गदा, उगवता सूर्य, त्रिशूल असे पर्याय दिले होते परंतु त्यांना मोठा धक्का बसला आहे. हे तिन्ही चिन्ह नाकारण्यात आले आहेत.

दोन्ही गटांना पक्षाचे काय नाव मिळालं ?

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ असे नाव दिलं आहे. त्याचबरोबर शिंदे गटाच्या चिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. मात्र, पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाच्या पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिलं आहे. पक्षाच्या नावाबाबत प्रथम प्राधान्य असलेल्या शिंदे गटाला विरोधी गटानेही प्रथम प्राधान्य दिल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अशा स्थितीत दोन्ही गटांना ते नाव दिले जात नाही…

3 नोव्हेंबर रोजी होणारी पोटनिवडणूक शिंदे आणि ठाकरे गटासाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. शिवसेनेने येथून पत्नी ऋतुजा यांना तिकीट दिले आहे. 2019 च्या निवडणुकीत पराभूत झालेले मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याचा शिंदे गट आणि भाजपचा डाव आहे.

पक्षाचे चिन्ह आणि नावावरून शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू असताना निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवले होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.