Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : मुंबईत हाय अलर्ट, दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ; सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द…

0

शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021 : कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन Omicron संकटात देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या छायेत आहे. त्यामुळे सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

वृत्तसंस्था एएनआयेला मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे की. खलिस्तानी तत्व शहरात दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने मुंबई पोलीस सतर्क झालं आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पोलिसांच्या सुट्या आणि साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या असून आजपासून मुंबईत तैनात असलेला प्रत्येक पोलिस कर्मचारी ड्युटीवर असणार आहे.

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी सांगितलं की, मुंबईतील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख स्थानके, दादर, वांद्रे चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर स्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उद्या 3000 हून अधिक रेल्वे अधिकारी तैनात केले जाणार आहे.

राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुंबईसह महाराष्ट्रात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचे म्हटले आहे. तिथेच मुंबईत कोविड-19 ची तिसरी लाट दिसू लागली आहे. कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटचा प्रभावही शहरात वाढला आहे.

त्यानंतर आता खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी येथे कलम 144 लागू केले आहे. आता येथे चार जणांना एकत्र जमण्यास मनाई आहे. साहजिकच यावेळी मुंबईतील नवीन वर्षाचे सेलिब्रेशन फिके पडणार आहे.

मुंबईत 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. आता नववर्षानिमित्त इनडोअर आणि आउटडोअर सेलिब्रेशनवर बंदी घालण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.