Take a fresh look at your lifestyle.

Atal Pension Yojana ने बाबत मोठं अपडेट ; आता ‘या’ लाभार्थ्यांना दरमहा 5000 रु. मिळणार नाही ; योजनेतूनही काढून टाकलं !

0

शेतीशिवार टीम : 12 ऑगस्ट 2022 :- महागाईला सामोरे जाताना केंद्र सरकार विविध प्रकारे प्लॅन आखत आहे. काही दिवसांपूर्वीच माजी सैनिकांची पेन्शन देण्यासाठी सरकारकडे पैशांची किल्लत निर्माण झाल्याने अग्निपथ योजना आखली अन् आता सरकारने Atal Pension Yojana नेच्या ग्राहकांना ही मोठा धक्का दिला आहे

तुम्ही जर आयकर (Income Tax) भरत असेल तर तुम्हाला यापुढे केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. सरकारने 1 ऑक्टोबरपासून प्राप्तिकरदात्यांची या सामाजिक सुरक्षा योजना (APY) मध्ये नावनोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.

APY योजना 2015 मध्ये झाली सुरू…

सरकारने 1 जून 2015 रोजी अटल पेन्शन योजना (APY) सुरू केली होती, प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी… योजनेच्या सदस्यांना त्यांच्या योगदानानुसार वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हमी सह मासिक 1,000 ते 5,000 रुपये किमान पेन्शन मिळते.

30 सप्टेंबरपर्यंत योजनेत सहभागी होण्याची संधी :-

वित्त मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, “1 ऑक्टोबर 2022 पासून, कोणताही नागरिक जो आयकरदाता (Tax Payer) आहे किंवा होईल तो APY मध्ये समाविष्ट होण्यास पात्र असणार नाही. बुधवारी जारी करण्यात आलेली नवीन अधिसूचना 1 ऑक्टोबर 2022 पूर्वी योजनेत सामील झालेल्या सदस्यांना लागू होणार नाही…

या ग्राहकांचं APY खाते होणार बंद :-

अधिसूचनेनुसार, जर एखादा सदस्य, जो 1 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यानंतर योजनेत सामील झाला असेल आणि त्यानंतर तो अर्जाच्या तारखेला किंवा त्यापूर्वी आयकरदाता असल्याचे आढळून आले, तर त्याचे APY खाते बंद केले जाईल. आणि आत्तापर्यंत जमा झालेली पेन्शनची रक्कम त्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली जाईल. आयकर कायद्यानुसार, 2.5 लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना आयकर भरण्याची गरज नाही…

18 वर्षे वयाच्या व्यक्तीसाठी मासिक पेन्शनसाठी योगदानाची रक्कम :-

मासिक पेंशन मासिक योगदान
1000 रुपये  42 रुपये
2000 रुपये  84 रुपये
3000 रुपये 126 रुपये
4000 रुपये 168 रुपये
5000 रुपये 210 रुपये
Leave A Reply

Your email address will not be published.