Tata ने Maruti आणि Mahindra ला मागे टाकलं, ‘या’ SUV ने काही महिन्यांतच 1 लाख युनिट्सच्या विक्रीसह मोडले सर्व रेकॉर्ड ; पहा डिटेल्स
शेतीशिवार टीम : 12 ऑगस्ट 2022 :- कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट भारतीय कार मार्केट ग्राहकांना आकर्षित करत आहे. या सेगमेंटमध्ये सातत्याने नवनवीन मॉडेल्स सादर केली जात आहेत, ज्यांना ग्राहकांचा पूर्ण पाठिंबाही मिळत आहे. या सेगमेंटमध्ये, टाटा मोटर्सच्या कॉम्पॅक्ट SUV Punch ने एक नवीन रेकॉर्ड बनवलं आहे, कंपनीच्या मते, नवीन पंच गेल्या वर्षी ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच करण्यात आली होती अन् अवघ्या 10 महिन्यांत या SUV ने एक लाख विक्रीचा टप्पा पार केला आहे.
एवढ्या कमी वेळात आत्तापर्यंत कोणतही वाहन पोहचलं नव्हतं. या कारच्या यशामागे कंपनीने सांगितले की, 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारे हे त्यांच्या सेगमेंटमधील पहिले वाहन आहे, ग्राहकांचा या कारवर खूप विश्वास बसला असून विक्रीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पंच लॉन्च झाल्यापासून देशातील टॉप 10 कार म्हणून लिस्टेड राहिली आहे. आणि त्याची विक्री 22 जुलैमध्ये सर्वाधिक 11,007 युनिट्स इतकी झाली आहे.
पहा,Tata Punch चे फीचर्स, इंजिन आणि किमतीबद्दल…
Tata Punch ही कंपनीकडून विकली जाणारी सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट SUV आहे. ही चार ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल ज्यात प्युअर, ॲडव्हेंचर, ॲक्प्लिश्ड आणि क्रिएटिव्ह व्हेरियंटचा समावेश आहे. ही 5-सीटर SUV खासकरून सेफ्टीसाठी बनवण्यात आली आहे. या SUV ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.
इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, पंचमध्ये 1.2-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 86PS पॉवर आणि 113Nm जनरेट करते. Altroz च्या धर्तीवर यात 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. या SUV ची खास गोष्ट म्हणजे याला 187mm चा ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे.
फिचर्सच्या बाबतीत, यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक एअर कंडिशन (AC), ऑटोमॅटिक हेडलाइट आणि वायपर्स, क्रूझ कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) मिळेल. ब्रेक असिस्ट, रियर पार्किंग कॅमेरा यांसारखे फीचर्स देण्यात आहेत. सर्वसाधारणपणे, ही SUV 19 kmpl पर्यंत मायलेज देते.