DA Hike: कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी दिवाळीचं मोठं गिफ्ट! अखेर 4% DA वाढीला मंजुरी, खात्यात येणार 15,144 रुपये, पहा कॅल्क्युलेशन..

0

केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ मंजूर करण्यात आली. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी हे एक उत्तम गिफ्ट मिळालं आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने बुधवारी त्याला मंजुरी दिली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल. 1 जुलै 2023 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 48 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 65 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे..

कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता महागाई भत्त्याचे नवीन दर दिले जातील. ऑक्टोबरच्या पगारासह नवे दर दिले जातील. यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसेही मिळणार आहे. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. 4 टक्क्यांच्या वाढीसह, महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांवर पोहोचला आहे. दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळाला लाभ ?

7व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या नवीन दरांचा लाभ मिळाला आहे. कर्मचार्‍यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरसाठी महागाई भत्त्याची थकबाकी (DA Arrears) देखील दिली जाणार आहे. थकबाकी 42 टक्के आणि 46 टक्के दरम्यान वाढलेल्या दराच्या फरकाची असणार आहे.

दसऱ्यापूर्वी दिवाळीचं गिफ्ट..

सरकारने दसऱ्यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. दसर्‍यापूर्वी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून आता ऑक्टोबरच्या पगारात अतिरिक्त पैसे मिळतील, असे स्पष्ट झालं आहे. मंत्रिमंडळाच्या म्हणण्यानुसार, महागाई भत्त्याच्या वाढीव दरांमुळे सरकारी तिजोरीवर सुमारे 17000 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.

कर्मचाऱ्यांवर ‘लक्ष्मी’ची कृपा.. 

ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता जाहीर झाला, तेव्हा तोही ऑक्टोबरच्या अखेरीस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ नोव्हेंबर विशेषत: दिवाळीचा सण कर्मचाऱ्यांसाठी चांगला जाणार आहे. कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याच्या लाभाव्यतिरिक्त ऍन्युअल बोनसही दिला जाईल आणि दिवाळीचा वार्षिक बोनसही रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांना दिवाळीत खर्च करण्यासाठी चांगलीच रक्कम मिळणार आहे. याशिवाय 3 महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे..

पेन्शनधारकांनाही मिळणार लाभ..

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याव्यतिरिक्त, पेन्शनधारकांच्या महागाई सवलतमध्येही मोठा फायदा दिसून आला आहे. त्यांच्यासाठीही DR मध्ये त्याच दराने 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. हा देखील 1 जुलै 2023 पासून लागू होईल. पेन्शनधारकांना पेन्शनसह DR चे नवीन दर दिले जातील. पेन्शनधारकांसाठी महागाई सवलतही 46 टक्क्यांवर पोहोचली आहे..

पगार किती वाढणार ? DA कॅल्क्युलेशन घ्या समजून..

7 व्या वेतन मॅट्रिक्सनुसार, अधिकारी श्रेणीच्या वेतनात बंपर वाढ होईल. जर एखाद्याचे मूळ वेतन सध्या 31,550 रुपये आहे. याचे कॅल्क्युलेशन केलं तर..

मूळ वेतन – 31550 रुपये
एकूण महागाई भत्ता (DA) – 46% – रुपये 14513 प्रति महिना..
आतापर्यंत दिलेला महागाई भत्ता (DA) – 42% – रुपये 13251.
महागाई भत्त्यात (DA) 4% वाढीसह, तुम्हाला 1262 रुपये अधिक (दर महिन्याला) मिळतील..
वार्षिक महागाई भत्ता – 4 टक्के वाढीनंतर, तुम्हाला 15,144 रुपये अधिक (एकूण 46 टक्के) मिळतील..

3 महिन्यांचा DA थकबाकीही होणार जमा..

ऑक्टोबरमध्ये 1 जुलै 2023 पासून लागू होणार्‍या महागाई भत्त्याच्या (DA increase) घोषणेमुळे, कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही 3 महिन्यांची थकबाकी मिळेल. अशा परिस्थितीत त्याला 1262+1262+1262=3,786 रुपये अधिक मिळतील.

याशिवाय सरकारने कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक बोनसही जाहीर केला आहे. हा लाभही कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्येच मिळणार आहे. सध्या, रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराच्या समतुल्य बोनसची प्रतीक्षा आहे. तेही दसऱ्यापर्यंत देण्यास सरकार मान्यता देईल, अशी अपेक्षा आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.