मुंबई मेट्रो लाईन – 2B चे चिता कॅम्प पर्यंत विस्तारित करण्याव्यतिरिक्त, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने मुंबई मेट्रोची 11.38 किमी लाईन-9 (रेड लाईन) ठाणे जिल्ह्यातील नवीन डोंगरी ट्रेन मेंटेनन्स डेपोपर्यंत विस्तारित करण्याची योजना आखली आहे.
18 सप्टेंबर रोजी, MMRDA ने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून डोंगरी डेपोपर्यंत मेन लाइनच्या विस्तारासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) मंजुरी मिळविण्यासाठी औपचारिकपणे अर्ज सादर केला होता. या रूट्सच्या विस्तारासोबतच तीन स्थानकांची वाढ होणार आहे.
सुभाषचंद्र बोस ग्राउंड स्टेशनपासून सुमारे 4.9 किमी लांबीच्या या प्रस्तावित विस्तारामध्ये उत्तन (डोगरी) रोडवरील मुर्धा आणि राय गोवन येथे 2 नवीन एलिव्हेटेड स्टेशन्स असणार आहे.
याशिवाय, डोंगरी – मीरा भाईंदर – दहिसर पूर्व – गुंदवली – CSIA टर्मिनल 2 ला जोडणाऱ्या संपूर्ण रेड लाईनसाठी BEML रेल गाड्यांवर देखरेख ठेवण्यासाठी डोंगरी डेपो बांधला जाणार आहे.
डोंगरी डेपो टेकडीवर वसलेल्या 41.36 हेक्टर जमिनीवर उभारण्याचे प्रस्तावित आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन एमएमआरडीएकडे सुपूर्द केली असून एमएमआरडीएच्या अर्जात ही जमीन सीआरझेडने बाधित झालेली नाही असे नमूद केले आहे. ‘एमएमआरडीए’ने या ठिकाणी प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले आणि निविदा तयार करण्याचे काम प्रक्रियेत आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.
मेट्रो लाईन 9 वर तब्बल 35 मीटर उंचीवर प्लॅटफॉर्म..
मेट्रो लाईन 9 च्या मेडेतियानगर स्टेशनवर ट्रिपल डेकर इमारत असणार आहे. यात वाहनांना पार्किंगची देखील सोय असणार आहे. ही लाईन 3 मेट्रो लाइन्सना संलग्न असणार आहे. या स्टेशनचे 85.50 टक्के पूर्ण झाले आहे..
या प्रस्तावामुळे, शहराची रेड लाईन 35.95 किमी लांबीची होणार ! ज्यामध्ये 4 सेक्शन असतील..
4.9 किमी लाइन – 9 विस्तार : डोंगरी डेपो – सुभाषचंद्र बोस मैदान
स्टेशनची नावे :- डोंगरी डेपो – सुभाषचंद्र बोस मैदान
11.38 किमी लाइन – 9 : सुभाष चंद्र बोस मैदान – दहिसर पूर्व
स्टेशनची नावे : पांडुरंग वाडी, मिरागाव, काशीगाव, साई बाबा नगर, मेडेतियानगर, शहीद भगतसिंग गार्डन आणि सुभाषचंद्र बोस मैदान
16.5 किमी लाइन – 7 : दहिसर पूर्व – गुंदवली (अंधेरी पूर्व)
स्टेशनची नावे – दहिसर पूर्व, ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर (पूर्वीचे महिंद्रा अँड महिंद्रा), आकुर्ली (पूर्वीचे बांडोंगरी), कुरार (पूर्वीचे पुष्पा पार्क), दिंडोशी (पूर्वीचे पठाणवाडी), आरे, गोरेगाव ई (पूर्वीचे महानंद), जोगेश्वरी ई (पूर्वीचे जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (पूर्वीचे अंधेरी पूर्व)
3.17 किमी लाइन – 7A : गुंदवली – CSIA टर्मिनल 2
स्टेशनची नावे – एयरपोर्ट कॉलनी आणि CSIA टर्मिनल 2