Jalna-Nanded Expressway बाबत मोठं अपडेट, 179Km अंतरासाठी 2,200 हेक्टर जमीन होणार खरेदी, शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार मोबदला..
मुंबई ते नागपूर या महाकाय समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी हे 520 Km काम झाले तो खुला झाला आहे. तर शिर्डी ते मुंबई या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून येत्या 4 महिन्यांत तेही काम मार्गी लागणार आहे.
आता या समृद्धी महामार्गाला आता जालना ते नांदेड महामार्गही जोडला जाणार आहे. या महामार्गाच्या कामालाही वेग आला असून, भूसंपादनाचे काम देखील अंतिम टप्प्यात आलं आहे. तर शेतकऱ्यांना मार्च महिन्यांपर्यंत मोबदला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 179 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर तब्बल 7 मोठे पूल, 8 इंटरचेंज पॉइंट असणार आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना नांदेडला जालन्यासोबत पर्यायी समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी राज्यात आणखी एका समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती.
या प्रस्तावित महामार्गाचे मोजमाप पूर्ण झाले असून, भूसंपादनाचे कामही अंतिम टप्प्यात आलं आहे. या महामार्गाच्या बांधकामासाठी जवळपास 14 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार असे म्हटले जात आहे. तर यासाठी एकूण 2,200 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.
या महामार्गाचे बांधकाम पूर्णपणे आरसीसीमध्ये होणार असल्याने हा महामार्ग मजबूत असणार आहे. या महामार्गावर एकूण 7 मोठे पूल असणार आहेत. तर दोन रेल्वे क्रॉसिंग ब्रिज असणार आहे. या महामार्गावर 8 ठिकाणी इंटरचेंज पॉइंट असतील तर जवळपास 18 ठिकाणी अंडरपास राहणार आहे. या महामार्गामुळे या दोन्ही शहरांतील 226 किलोमीटरचे अंतर जवळपास 60 किमी ने कमी होऊन 179.8 किलोमीटरपर्यंत येणार आहे.
या महामार्गाचा जालना जिल्ह्यातील 66.46 किलोमीटरचा पट्टा असून जालना, मंठा, परतूर या तालुक्यातून जाऊन पुढे परभणीतून 93 किलोमीटरचा पट्टा असून परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी, पूर्णा तालुक्यांतून जाणार आहे. तर पुढे नांदेड तालुक्यात पोहचणार आहे.
कसा आणि किती मिळणार मोबदला :- या लिंकवर करा क्लिक..
जालना जिल्ह्यातून तर नांदेड जिल्ह्यातून 19.82 किलोमीटरचा पट्टा जाणार आहे. जुन्या महामार्गापासून प्रस्तावित मार्ग हा केवळ 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे.
सहा महिन्यांनंतर होणार प्रत्यक्ष कामाला सुरुवात..
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर नागपूर ते शिर्डीपर्यंत वाहतूक देखील सुरु झाली आहे. नांदेड शहर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना ते नांदेड हा समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे.
हा प्रस्तावित समृद्धी महामार्ग जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांतून जाणार आहे. सहा महिन्यांनंतर या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नांदेड ते जालना समृद्धी महामार्गाचे भूसंपादनाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. त्याबाबतीतले मूल्यांकन देखील मागविण्यात आले आहेत. लवकरच याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची जमीन खरेदी केली जाणार आहे. असे एल. डी. सोनवणे, तहसीलदार, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, जालना यांनी सांगितले आहे.