महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई ते नागपूर हे 16 तासांचे अंतर केवळ 8 तासांवर आणण्यासाठी मुंबई ते नागपुर हा 701 Km चा समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्पाचे काम नागपूर ते शिर्डी 502Km अंतर पूर्ण झालं असून या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग…

परंतु, या बहुचर्चित नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवासी वाहनांबत मोठं अपडेट समोर आलं आहे. आज वाहतूक विभागाने अधिसूचना काढली असून या महामार्गावरून दुचाकी, तीनचाकी व चारचाकी रिक्षांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यापूर्वीच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भिंतीमुळे चर्चेत असलेल्या या मार्गावरुन दुचाकीसह रिक्षांना परवानगी नसणार हेही स्पष्ट झालं आहे.

तसेच या अधिसूचनेत गाड्यांची वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या वेगाच्या अनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

पहा, वेगमर्यादा… 

ड्रायव्हरसह 4 सीटर कपॅसिटी असलेल्या कार, SUV वाहनांसाठी फ्लॅट एरियात म्हणजेच सपाट भागात 140Km व घाट-बोगद्याच्या भागात ताशी 120Km अंतर निश्चित केलं आहे.

ड्रायव्हरसह 8 सीटर कपॅसिटी असलेल्या M1 प्रकारातील वाहनांसाठी फ्लॅट एरियात म्हणजेच सपाट भागात 120Km व घाट-बोगद्याच्या भागात ताशी 100Km अंतर निश्चित केलं आहे.

ड्रायव्हरसह 9 सीटर कपॅसिटी असणाऱ्या M1 व M3 या प्रकारांतील प्रवासी वाहनांसाठी सपाट भागात ताशी 100Km व घाट-बोगद्याच्या भागात ताशी 80Km अंतर निश्चित केलं आहे.

समृद्धी महामार्गाबाबत थोडक्यात माहिती….

MSRDC द्वारे 701 किमी मुंबई – नागपूर द्रुतगती मार्ग (Samruddhi Mahamarg) हा नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गाव ते ठाणे जिल्ह्यातील आमणे गावाला जोडणारा मार्ग संरेखन (alignment) असलेला 6 लेन प्रवेश – नियंत्रित रोड आहे.

या ग्रीनफिल्ड प्रकल्पाची पहिल्यांदा घोषणा 2015 मध्ये करण्यात आली आणि जुलै 2017 मध्ये भूसंपादनाला सुरुवात झाली. डिसेंबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याची पायाभरणी करण्यात आली आणि जानेवारी 2019 मध्ये बांधकाम सुरू झालं. जे पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी पूर्ण झालं आहे.

एकूण अंदाजित खर्च : रु. 57,000 कोटी
प्रोजेक्ट लेन्थ : 701Km
लेन : 6

स्टेटस : अंडर कन्स्ट्रक्शन
ओपनिंग : 2022 (दिवाळी) (502 Km नागपूर – शिर्डी)
आवश्यक भूसंपादन : 24,255 एकर (9,900 हेक्टर)

अधिकृत नाव : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्र
व्होनर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)
प्रोजेक्ट मॉडेल : EPC (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *