‘या’ स्वस्तात मस्त Car ने सर्वांना मागे टाकत बनली नंबर -1 ; WagonR, Baleno, Punch, Creta ही फेल, किंमत फक्त 3.39 लाख रु.
मारुती सुझुकीने त्यांची सप्टेंबर महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे आणि पुन्हा एकदा कंपनीच्या सर्वाधिक गाड्या, टॉप 10 कारमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. टॉप 10 कारमध्ये मारुतीच्या 6 कारचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही अल्टोची जादू पुन्हा चालली आहे…
गेल्या महिन्यात अल्टोने 24,844 युनिट्सची केली होती विक्री
अल्टोने (Alto) गेल्या महिन्यात 24,844 युनिट्सची विक्री केली होती, तर गेल्या वर्षी कंपनीने केवळ 12,141 युनिट्सची विक्री केली होती, म्हणजेच या वेळी वार्षिक विक्रीत 104.60% वाढ झाली आहे. यावेळी कंपनीने 12,701 जास्त युनिट्सची विक्री केली आहे, तर वॅगनआर (WagonR) 20,078 युनिट्ससह टॉप 10 मध्ये दुसऱ्या स्थानावर गेली आहे आणि मारुतीच्या बलेनोने (Baleno) तिसरं स्थान पटकावलं आहे. बलेनोने 19,369 युनिट्सची विक्री केली.
मारुती सुझुकी अल्टो (Alto) 800 छोट्या फॅमिलीमध्ये लोकप्रिय आहे. दिल्लीमध्ये या कारची एक्स-शोरूम किंमत 3.39 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार 796cc (BS 6) 3-सिलेंडर इंजिनद्वारे सज्ज आहे, जी 48PS पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करते, हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे, कारचे मायलेज 22.5Kmpl आहे. CNG वर, ही कार 31.59 km/kg पर्यंत मायलेज देते.
सेफ्टीसाठी, तुम्हाला या कारमध्ये EBD सह ABS, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टीम, ड्रायव्हर साइड एअरबॅग आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखे अनेक उत्कृष्ट फीचर्स मिळतात.
काही दिवसांपूर्वी मारुतीने भारतात न्यू Alto K10 लॉन्च केली होती. या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यावेळी नवीन Alto K10 मध्ये, 1.0L Dual Jet, Dual VVT पेट्रोल इंजिन ऑल न्यू K-Series सह देण्यात आलं आहे जे 67bhp पॉवर आणि 89Nm टॉर्क देते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स ऑप्शनसह येते. न्यू Alto K10 चे मायलेजचे आकडे 24.90kmpl (AMT) आणि 24.39kmpl (MT) असे आहेत.