नाशिक-नगर-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे : फक्त 2 चं तासात प्रवास होणार पूर्ण , 3 जिल्ह्यांतील ‘या’ गावातून जाणार, रूटला 24 स्टेशन, पहा संपूर्ण रोडमॅप
शेतीशिवार टीम : 8 ऑक्टोबर 2022 :- राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी पुणे- अहमदनगर – नाशिक (Nashik-Ahmednagar-Pune) अति- जलद हाय सेमी हाय-स्पीड रेल कॉरिडॉर प्रोजेक्टला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
हा प्रोजेक्ट महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (MRIDC) द्वारे कार्यान्वित केला गेला आहे, ज्याला MAHARAIL देखील म्हणतात, हा महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे, जो राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे.
या प्रोजेक्टबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्य मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली असून केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने राहिलेल्या भूसंपादनाचे काम सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी MAHARAIL ला दिल्या आहेत.
पुणे -अहमदनगर- नाशिक हा 234.60 Km चा प्रस्तावित सेमी-हाय-स्पीड दुहेरी रेल्वे मार्ग आहे जो महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिकला 24 स्टेशनद्वारे जोडला जाणार असून 16,039 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, यामध्ये राज्याचा 3,273 कोटींचा हिस्सा आहे.
या ग्रीनफिल्ड मार्गावर प्रवासी रेल्वे गाड्या, 2027 पर्यंत 200 Km प्रतितास वेगाने धावणार असून पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमधून जात असताना पुणे ते नाशिक दरम्यानचे अंतर फक्त दीड तासात पूर्ण होणार आहे.
या मार्गावरील मालवाहतूक गाड्या 100 Km प्रतितास वेगाने धावणार असून चाकण, राजगुरूनगर, खेड, नारायणगाव आणि मंचरमधील विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यासारख्या महत्त्वाच्या MIDC क्षेत्रांना जोडून औद्योगिक विकासासाठी एक नवीन मार्ग उघडण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा मानला जात आहे.
चाकण, राजगुरूनगर, सिन्नर, या MIDC ना जोडण्यासाठी खाजगी फ्रेट टर्मिनल (PFT), ड्राय पोर्ट, मल्टीमॉडल आणि कमर्शियल हब, गोदामे आणि स्थानिक उद्योगांनी सुचवलेल्या ठिकाणी साइडिंग विकसित करण्याची मोठी योजना आहे.
या प्रकल्पाला फेब्रुवारी : 2020 मध्ये, लाईनचा सुधारित डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेने (CR) मंजूर केला होता. या DPR ला आता महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली असून अंदाजे 1458.69 हेक्टर जमीन भूसंपादित होणार आहे. काही गावांमध्ये भूसंपादन सुरु झालं आहे.
नाशिक जिल्ह्यातील या 23 गावांमधून जाणार हा रेल्वेमार्ग :-
नाशिक जिल्ह्यातील या रेल्वेमार्गासाठी 2 तालुक्यांचा समावेश झाला असून नाशिक मधील देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव या गावातून जाणार तर…
सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा, चिचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटप्रिपी, बारागाव पिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडी मजरे, मुसळगाव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, दोडी खुर्द आणि बुद्रुक, नांदूरशिंगोटे, चास नळवंडी अशा 18 गावांतून हा रेल्वेमार्ग जाणार आहे.
पहा, 3 जिल्ह्यातील 24 स्टेशन :-
पुणे, हडपसर, मंजिरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबुत, साकुर, अंभोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, मोहादरी, शिंदे आणि नाशिक रस्ता
संपूर्ण रोडमॅप पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा…
लिंक :-
अधिक माहितीसाठी https://www.maharail.com/newsletter/news_letter_sep_20.pdf ही पीडीएफ डाउनलोड करा.
[…] […]