बँकांच्या निर्गुंतवणुकीची तयारी तीव्र जोमाने सुरु असून आता आयडीबीआय (IDBI) बँकेचे निर्गुंतवणुक होणार आहे. सरकारने या बँकेतील धोरणात्मक निर्गुंतवणुकीबाबत स्वारस्य अभिव्यक्तींना खरेदीसाठी आमंत्रित केलं आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) आणि भारत सरकारचा (Government of India) या बँकेत 95 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.

डिपार्टमेंट ऑफ डिसइन्व्हेस्टमेंट DIPAM द्वारे शेयर केलेल्या माहिती नुसार, 31 मार्च 2022 पर्यंत IDBI बँकेत LIC चा हिस्सा 49.24% आणि सरकारचा हिस्सा 45.48% आहे तर 5.28% हिस्सा जनतेकडे आहे.

सरकारची 60.72% हिस्सा विकण्याची तयारी :-

रिपोर्टनुसार, सरकार आणि LIC संयुक्तपणे IDBI बँकेतील 60.72% हिस्सा विकणार आहेत. सरकार 30.48% आणि एलआयसी (LIC) 30.24% विक्री करणार आहे. लिस्टेड प्रायव्हेट बँका, नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, SEBI रजिस्टर्ड AIFs म्हणजेच अल्टर्नेटीव्ह इन्व्हेस्टमेंट फंड यासाठी बोली लावू शकतात. याशिवाय प्रायव्हेट इक्विटी फंड, फॉरेन फंड आणि इन्व्हेस्टमेंट व्हीकलही यामध्ये सहभागी होऊ शकतात.

बोली लावणाऱ्यांची एकूण संपत्ती 22,500 कोटी असावी :-

बोली लावणार्‍यांची एकूण संपत्ती किमान 22,500 कोटी रुपये असावी. या बोलीमध्ये मोठे उद्योगपती, कॉर्पोरेट हाऊसेस आणि व्यक्तींचा समावेश करता येणार नाही. जर एखाद्या बोलीदाराला कंसोर्टियममध्ये सामील व्हायचे असेल तर जास्तीत जास्त चार संस्थांचा समावेश केला जाऊ शकतो. आयडीबीआय (IDBI) बँकेतील बोली जिंकणाऱ्या गुंतवणूकदाराला पुढील 15 वर्षांत त्याचा हिस्सा 26 टक्क्यांपर्यंत खाली आणावा लागणार आहे.

मार्केट कॅप आहे रु. 45912 कोटी :-

आज IDBI बँकेचा शेअर 42.70 च्या पातळीवर बंद झाला. 52 आठवड्यांचा उच्चांक 65.25 रुपये आणि निम्न 30.50 रुपये आहे. बँकेचे मार्केट कॅप 45,912 कोटी रुपये आहे. अशा स्थितीत सरकार आणि एलआयसीने मिळून 60 टक्क्यांहून अधिक भागभांडवल विकले, तर आजच्या किंमतीच्या आधारे ही रक्कम 27,500 कोटींहून अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *