देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी Hero MotoCorp ने त्यांच्या इलेक्ट्रिक सब-ब्रँड Vida अंतर्गत त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर V1 लॉन्च केली आहे. कंपनीने ही स्कूटर 2 व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे ज्यात Vida V1 Plus आणि Vida V1 Pro यांचा समावेश आहे.
किंमत, व्हेरियंट आणि फीचर्स :-
Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर दोन व्हेरियंट लॉन्च करण्यात आली आहे. Vida V1 Plus ची एक्स-शोरूम किंमत 1.45 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, तर Vida V1 Pro ची एक्स-शोरूम किंमत 1.59 लाख रुपये आहे. V1 इलेक्ट्रिक स्कूटर प्रथम बेंगळुरू, जयपूर, आणि नवी दिल्ली येथे लॉन्च केली जाणार असून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून डिलिव्हरी सुरू होणार आहे. जाणून घेऊया या स्कूटरच्या फीचर्सबद्दल…
Vida V1 Plus चे फीचर्स :-
या स्कूटरचा टॉप स्पीड 80 kmpl आहे. तर फुल चार्ज केल्यावर ती 143Km अंतर कापू शकते. 0-40km चा वेग गाठण्यासाठी 3.4 सेकंद लागतात. ही स्कूटर एक मिनिट चार्ज केल्यानंतर 1.2Km अंतर कापू शकते.
Vida V1 Pro चे फीचर्स :-
या स्कूटरचा टॉप स्पीड 80 kmpl आहे. तर पूर्ण चार्ज केल्यावर ते 165Km अंतर कापू शकते. 0-40km किमीचा वेग गाठण्यासाठी 3.2 सेकंद लागतात. ही स्कूटर एक मिनिट चार्ज केल्यानंतर 1.2Km अंतर कापू शकते.
स्कूटरमध्ये असं काय आहे खास :-
Vida V1 ची खास गोष्ट म्हणजे त्याची बॅटरी काढून तुम्ही ती घरीच चार्ज करू शकता. हे नवीन फीचर नसलं तरी काही स्कूटरमध्ये यापूर्वीही हे फीचर्स दिसलं आहे. याशिवाय, तुम्ही या स्कूटरचा टॉप स्पीड वाढवू शकता आणि 100kmph पर्यंत नेऊ शकता. हे तीन मोडसह येते. 7-इंचाची TFT स्क्रीन आहे, जी स्मार्ट कनेक्ट केलेल्या फीचर्ससह येते. स्कुटर्सनां OTA अपडेट्स मिळणार आहे, त्यामुळे भविष्यात आणखी फीचर्स अपडेट मिळू शकतात. Vida ने स्कूटरला रिव्हर्स असिस्ट, टू-वे थ्रॉटल आणि क्विक ओव्हरटेकसाठी बूस्ट मोडसह सुसज्ज केले आहे.
बॅटरी पूर्णपणे सेफ…
Hero MotoCorp या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीबद्दल सांगायचं झालं तर ती पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीने बॅटरीची टेस्टिंग केली आहे. बॅटरीची टेस्ट 2 लाख किलोमीटर, 25 हजार तास, हाय टेम्परेचरवर करण्यात आली आहे. बॅटरी पडल्यानंतर किंवा आदळल्यानंतरही त्याच क्षमतेने आपले काम करत राहील. तुम्ही स्कूटरमधून बॅटरी काढू शकता आणि सोबत घेऊनही जाऊ शकता.
ही बॅटरी घर किंवा ऑफिसमध्ये कुठेही चार्ज करता येते. कंपनीने 72 तासांची टेस्ट ड्राइव्ह देखील केली आहे. यात 7 इंची टचस्क्रीन आहे. यात कीलेस कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल सारखं फीचर्स देखील देण्यात आलं आहे.