पुणे – अहमदनगर – संभाजीनगर जिल्ह्यातील जमीनदारांसाठी एक मोठं अपडेट समोर आलं आहे. पुणे-अहमदनगर – संभाजीनगर ग्रीनफील्ड महामार्गासाठी पुणे जिल्ह्यातील जमिनीचा ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तालुकानिहाय भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली आहे.
मात्र, अहमदनगर – संभाजीनगर जिल्ह्याचं काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर याबाबत औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्वाची माहिती समोर आली आहे. अजून या दोन जिल्ह्यांच्या भूसंपादनाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून हे अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. मग पुणे जिल्ह्यात भूसंपादन कसाकाय सुरु झालं आहे ?
तर शेतकरी मित्रांनो, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीफिकेशनची वाट न पाहता स्वतःहून एनएचआयला पत्र पाठवले व त्यांच्याकडून भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्याची परवानगी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, अजून औरंगाबाद जिल्ह्याबाबत अधिसूचना (नोटिफिकेशन) निघालेलं नाही. ते निघाल्यावरच अधिकारी नियुक्त होतील, भूसंपादनाची जबाबदारी असलेले उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे म्हणाले, ‘नोटिफिकेशन जारी होताच संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
अहमदनगर जिल्हाही या भूसंपादनाच्या प्रोसेसमध्ये मागे असून अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडेही नोटिफिकेशन आलेले नाहीये, परंतु येत्या 15 दिवसांत या दोन्ही जिल्ह्यांच्या भूसंपादनासाठी नोटिफिकेशन येणार असून भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. यानंतरच शेतकऱ्यांची नावे गट नंबर प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे अजून 2 महिने तरी जमीनदारांना वाट पाहावी लागणार आहे.