Take a fresh look at your lifestyle.

Farmer Scheme : 13 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना 15 लाखांचं गिफ्ट, जाणून घ्या, योजनेविषयी सर्वकाही..

0

केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविते. त्यामागील उद्दिष्ट एकच ते म्हणजे देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा, यासाठी सरकार नवनवीन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेहमीच मदत करत असते. याचा दृष्टीने केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक नवा उपक्रम सुरू केला आहे.

या सरकारी योजनेचा लाभ केवळ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी तसेच त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत देशभरातील शेतकरी बांधवांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार आर्थिक मदत करेल. शेतकरी बांधवांनो, आज या पोस्टच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारच्या या योजनेशी संबंधित सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.

काय आहे, प्रधानमंत्री किसान FPO योजना ?

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘प्रधानमंत्री किसान FPO योजना’ (PM किसान FPO योजना) सुरू केली आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक संस्था सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या मदतीने शेतकरी स्वत:चा शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करू शकतो. यासोबतच खते, बियाणे किंवा औषधे व उपकरणे इत्यादी खरेदी करण्याबरोबरच चांगला नफा देखील कमावू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागेल. यानंतरच तुम्हाला सरकारच्या या योजनेचा लाभ मिळू शकेल.

काय आहेत, प्रधानमंत्री किसान एफपीओ योजनेसाठी पात्रता आणि अटी :-

प्रधानमंत्री किसान एफपीओ योजनेत अर्ज करण्यासाठी, अर्जदाराला सरकारने ठरवून दिलेल्या पात्रता आणि अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे, त्या खालीलप्रमाणे

अर्जदार शेतकरी भारताचा रहिवासी असावा.

अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची लागवडयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे मैदानी भागात FPO मध्ये किमान 300 सदस्य आणि डोंगराळ भागात 100 सदस्य असावेत.

प्रधानमंत्री किसान एफपीओ योजनेत अर्ज करण्यासाठी, अर्जदाराकडे सर्व महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे आधार कार्ड :-

अर्जदाराचे रेशन कार्ड
अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
अर्जदाराच्या जमिनीची कागदपत्रे
अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
अर्जदाराच्या बँकेच्या पासबुकची प्रत
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज :-

सर्वप्रथम, राष्ट्रीय कृषी बाजाराच्या enam.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होम पेज उघडल्यावर FPO या पर्यायावर क्लिक करा.

FPO च्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ‘Registration’ या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर योजनेचा रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.

आता फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.

फॉर्ममध्ये सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुमचे बँक पासबुक आणि ओळख पत्र स्कॅन करा आणि अपलोड करा.

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.

फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एसएमएसद्वारे यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असं करा लॉगिन :-

योजनेसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तुमचा अर्ज पूर्ण होईल. योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासण्यासाठी खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील

लॉग इन करण्यासाठी, सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

आता तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल.

होम पेजवर आल्यानंतर FPO च्या ऑप्शनवर क्लिक करा.

FPO वर क्लिक केल्यानंतर लॉगिनच्या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर, तुमच्या समोर लॉगिन टॅब उघडेल.

या टॅबमध्ये तुमचे नाव, पासवर्ड आणि कॅप्चा कोड चांगल्या प्रकारे भरा.

यानंतर तुमची लॉगिन प्रोसेस पूर्ण होईल.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासू शकता..

Leave A Reply

Your email address will not be published.