कांद्याचे दर गडगडल्यामुळे अतिशय कमी दरामध्ये आपल्या कांद्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 16 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. ज्याच्यामुळे 2018 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरमध्ये कांद्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.
यासाठी 2 कोटी 64 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो यांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आहे आज आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
2018 च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये कांद्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणात गडगडले होते आणि याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल दोनशे रुपये एवढे अनुदान जाहीर करण्यात आले होते. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
यासाठी महाराष्ट्रामधील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी या अनुदानासाठी पात्र असतील अशा प्रकारे या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती. याच योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या आकस्मित निधीमधून 114.80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये याच्यासाठी निधी वितरित करण्यात आला होता.
याबाबत 4 जानेवारी 2020 रोजी निर्णय करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली होती. यामुळे राज्यातील 5 लाख 53 हजार 857 शेतकऱ्यांना 504 कोटी रुपयांचे अनुदान देखील वितरित करण्यात आलेल होतं.
मात्र अनुदान वितरित करत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मधील बऱ्याच लाभार्थ्यांचा शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काहीतरी त्रुटी असल्यामुळे ते अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते आणि आता या अर्जाची पूर्तता केलेल्या, त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी 1 नोव्हेंबर 2022 रोजी मंजुरी देऊन यासाठी 2 कोटी 64 लाख रुपये एवढ्या निधीची मागणी करण्यात आलेली होती.
मात्र लेखाशीर्षा मध्ये काही त्रुटी असल्यामुळे या निधीचे वितरण अद्याप देखील करण्यात आले नव्हतं. यानंतर आज 16 नोव्हेंबर 2022 रोजी एका नवीन लेखाशीर्षाला मंजुरी देऊन या शासन निर्णयाचा संधिपत्र काढण्यात आलेले आहे. ज्याच्यामुळे आता या नवीन लेखाशिर्षाच्या मार्फत 2 कोटी 64 लाख रुपयांचे अनुदान आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2018 मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्याला प्रति क्विंटन दोनशे रुपये याप्रमाणे अनुदान वितरित करण्यासाठी होणार आहे.
कमी दरात कांदाविक्री केल्याने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या संदर्भातील हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता, जो आपण https://gr.maharashtra.gov.in/Site/Up या संकेतस्थळावरती पाहू शकता..