तुम्ही रेल्वे कर्मचारी असाल, किंवा तुमचे कुणी नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट रेल्वेच्या सेवेत असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. रेल्वेतील सुपरवायजर श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनच्या नव्या प्रणालीला मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत रेल्वे ग्रेड – 6 कर्मचाऱ्यांना थेट पदोन्नती मिळू शकणार आहे.
या नवीन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना वर्ग अ पर्यंत प्रमोशन देता येईल. या निर्णयाचा फायदा तब्बल 80 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांची ही मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती, जी रेल्वेने आता मान्य केली आहे.
48 हजारांपर्यंत वाढणार पगार :-
भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे पात्र लोकांसाठी संधीचे नवे दालन खुले होणार आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा पगार अडीच ते चार हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. म्हणजेच त्यांना 48 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले की नवीन धोरणांतर्गत स्तर 7 ते स्तर 8 पर्यंत 50 टक्के कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय 4 वर्षात लेव्हल- 8 ते लेव्हल- 9 पर्यंत नॉन-फंक्शनल ग्रेडमध्ये पदोन्नती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा थेट फायदा 40,000 पर्यवेक्षकांना होईल आणि सर्वांना दरमहा सरासरी 2,500-4,000 रुपये अतिरिक्त वेतन मिळेल.
वंदे भारत ट्रेनबाबत मोठा निर्णय
येत्या 5-6 महिन्यांत 100 किमीपर्यंतची सीमारेषा तयार केली जाईल, जेणेकरून वंदे भारत ट्रेनसोबत जनावरांची होणारी टक्कर टाळता येईल, असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसोबत घडलेल्या काही घटना पाहता हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे