महावितरणद्वारे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेच्या माध्यमातून 3 हजार कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून याकरिता 15 हजार एकर जमिनीवर सुमारे 4 हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत प्रतिवर्ष 75 हजार रुपये प्रति हेक्टर दराने भाडेतत्त्वावर भूखंड घेण्यात येणार आहेत. या योजनेद्वारे कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या 5 किमीच्या परिघाच्या परिसरात 25 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित करून या वीज वाहिन्यांवरील शेतकरी मित्रांना दिवसा 8 तास वीज देण्याचा महावितरणचा प्रयत्न असणार आहे.
या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुकर व्हावी यासाठी महावितरणने ऑनलाइन लँड पोर्टल सुरू केले आहे. (त्या पोर्टल वरील अर्जासंबंधी ऑनलाईन प्रोसेस आपण खाली पाहणार आहोत) शेतकरी विकेंद्रित सौर प्रकल्प उभारण्यासाठी आपली जमीन देऊ शकतो. तसेच सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या 33/11 किलोवॅट उपकेंद्राशी थेट जोडला जाईल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील 30 टक्के कृषी वीज वाहिन्या सौर ऊर्जेवर आणण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आलं आहे. यासाठी 4 हजार मेगावॅट वीज निर्मितीसाठी महावितरण शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेणार आहे.
महावितरणला 2 हजार 500 उपकेंद्रांमधील 4 हजार मे.वॅ. क्षमतेच्या 3 हजार वाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणासाठी 15 हजार एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात समितीचं गठन :-
प्रत्येक जिल्ह्यासाठी समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी महावितरणच्या मंडल कार्यालयाचे अधीक्षक, अभियंता, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक व महाऊर्जा विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश राहील. सौर ऊर्जा वीजनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी जमीन तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी ही तजवीज करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीसाठी आगाऊ ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले आहे .
वार्षिक भाडेपट्ट्याचा दर निश्चित :-
या योजनेअंतर्गत कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खासगी जमीन महावितरणला भाडेपट्ट्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या 6 टक्के दरानुसार परिगणत केलेला दर किंवा प्रतिवर्ष 75 हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे जी रक्कम जास्त असेल, त्या नुसार वार्षिक भाडेपट्ट्याचा दर निश्चित करण्यात येणार आहे. प्रथम वर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दराच्या आधारावर प्रत्येक वर्षी 3 टक्के सरळ पद्धतीने वाढ करण्यात येईल.
महत्वाची कागदपत्रे :-
शेतकऱ्याचे आधार कार्ड
ओळखपत्राची प्रत
लागवडीयोग्य जमिनीची कागदपत्रे
जमिनीचे खाते
जमिनीचा नकाशा
सौर संयंत्रासाठी जागा
शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2023 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया :-
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, लाभार्थ्याने दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्यात…
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.
तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
आता तुम्हाला सुविधा या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला रजिस्ट्रेशन च्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर उघडेल.
या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व मुख्य माहिती द्यावी लागेल.
या फॉर्मसोबत तुम्हाला सर्व मुख्य कागदपत्रे जोडावी लागतील.
आता तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.