Take a fresh look at your lifestyle.

देशातली सर्वात स्वस्त Electric car लॉन्च, फक्त 2 हजारांत करा बुक; सिंगल चार्जमध्ये 200km रेंज, किंमत इतकी स्वस्त की..

0

जर तुम्ही कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. होय, तुम्ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करू शकता. आणि या कारची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा सुद्धा कमी आहे. 

प्रॉडक्शन कंपनी PMV इलेक्ट्रिक ला आतापर्यंत मायक्रो इलेक्ट्रिक कारसाठी आतापर्यंत 6000 हून अधिक बुकिंग मिळालं आहे. तर या देशातली या सर्वात स्मॉल आणि स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया..

EV ची किंमत फक्त 4 लाख 79 हजार..

मुंबईस्थित EV स्टार्टअप PMV इलेक्ट्रिकने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार, EAS-e लॉन्च केली आहे. नॅनो-आकाराची ही EV आता अधिकृतपणे भारतातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची किंमत 4.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. PMV इलेक्ट्रिकने आधीच EaS-E नॅनो इलेक्ट्रिक कारसाठी सुमारे 6,000 बुकिंग पूर्ण केलं आहे. ही इलेक्ट्रिक कार केवळ 2000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते.

सीटिंग कॅपिसिटी आणि लाइटिंग :-

PMV EaS-E मधील लाइटिंगबद्दल बोलायचं झालं तर, यात सर्क्युलर हेडलॅम्प आणि एक LED लाइट बार आहे, ज्यामुळे या EV ला एक आकर्षक लुक भेटतो. स्लिम एलईडी लाईट्ससह या कारला एक फंकी लुक आहे. PMV EaS-E ही देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार देखील आहे. यात एका वेळी दोन प्रौढ व्यक्ती आणि एक मूल बसू शकतं.

मायक्रो इलेक्ट्रिक कारचे फीचर्स पहा. . .

मायक्रो इलेक्ट्रिक कारच्या फीचर्सच्या यादीमध्ये डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एअर कंडिशनिंग, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट यांचा समावेश आहे.

चार्जिंग टाइम आणि रेंज :-

PMV EaS-E एकदा चार्ज केल्यावर जास्तीत जास्त 200 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते, तर कमीत कमी 160 किमी रेंजचे आश्वासन या ईव्ही कंपनीने दिलं आहे. ही ईव्ही चार तासांपेक्षा कमी वेळेत पूर्णपणे चार्ज होईल.

मोटर पॉवर आणि टॉप स्पीड :-

ही EV 13 एच पी ची कमाल पॉवर आणि 50 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. वेगाच्या बाबतीत, ही EV 70 kmph चा टॉप स्पीड देते. कंपनीचा दावा आहे की, ही ईव्ही 0 ते 40 किमी प्रतितास वेग केवळ 5 सेकंदात पकडते.

कधी होणार डिलिव्हरी ?

PMV इलेक्ट्रिक सध्या पुण्यात आपला प्लांट उभारण्यासाठी भागीदारांशी चर्चा करत आहे. उत्पादन वाढवण्याबरोबरच, कंपनी पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत आपल्या ग्राहकांना ईव्ही डिलिव्हरी सुरू करणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.