शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासून थकबाकीसह महागाई भत्ता 34% ऑगस्ट 2022 च्या वेतनासोबत लागू करण्याचा शासन निर्णय प्रसारित झाला होता. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांना मात्र 28% भत्त्यावरचं समाधान मानावं लागत होतं. महागाई भत्त्याच्या मागण्यांबाबत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. परंतु आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
एसटी कामगारांना जानेवारी 2022 पासून 34% महागाई भत्ता थकबाकीसह ऑगस्ट 2022 ते सप्टेंबर 2022 च्या वेतनासोबत देण्यात यावा असा निर्णय झाला असून राज्य सरकारने एसटी महामंडळाला याबद्दलचे पत्र पाठवलं आहे.
राज्यातील शासकीय, जिल्हा परिषदा, निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना 34% महागाई भत्त्याच्या फरकासह लागु करणेबाबतच्या प्रस्तावाला वित्त विभागाकडुन शिक्कामोर्तब करण्यात होतं, त्यामुळे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढीची प्रतिक्षा संपली आहे.
सदर महागाई भत्ता हा जानेवारी 2022 पासुन लागु करण्यात येणार असल्याने, जानेवारी ते जून या कालावधीमधील महागाई भत्त्याचा फरक जुलै महिन्याच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येईल .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासुनची महागाई भत्त्याच्या वाढीची प्रतीक्षा संपली आहे असं म्हणता येईल.
आश्चर्याची बाब म्हणजे, मागील तीन वर्षांत महामंडळ कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात झालेल्या वाढीच्या फरकाची रक्कम थकीत होती. राज्यातल्या एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी एसटी कामगार युनियन, एसटी कर्मचारी काँग्रेस, एसटी कामगार संघटना आणि एसटी कामगार सेना या सर्व संघटनांकडून वेळोवेळी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता.
तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 34% महागाई भत्ता असून, एसटी कर्मचाऱ्यां मात्र 28 टक्के भत्त्यावरचं समाधान मानावे लागत होते. परंतु या मागण्यांबत सरकार उदासीन दिसत होतं परंतु आज अखेर शिंदे – फडणवीस निर्णय घेतल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे