पशुपालक शेतकऱ्यांना बायोगॅसच्या उभारणी करता अनुदान देणारी एक महत्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय बायोगॅस मिशन. याच अभियानाच्या अंतर्गत 2022-23 या वर्षाकरिता एक घनमीटर पासून 20 ते 25 घनमीटर पर्यंतच्या बायोगॅसच्या सयंत्राच्या उभारणी करता 5200 एवढे उद्दिष्ट राज्य सरकारकडून उपलब्ध झाले आहे. आणि याच्याच अंतर्गत आता राज्यामध्ये ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
शेतकऱ्यांना शेती करत असताना स्वच्छ इंधन मिळावे आणि इंधनावरचा अनावश्यक खर्च कमी व्हावा यासाठी पूरक असा व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून आपण बायोगॅस कडे पाहू शकतो. बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वच्छ इंधन तसेच इंधनावरील होणारा अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो.
याचबरोबर बायोगॅसच्या माध्यमातून निघणारी स्लरी ही शेतकऱ्यांना एक उत्तम असं खत म्हणून वापरता येते. याच्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बायोगॅसच्या उभारणी करता प्रोत्साहन दिले जात आहे.
पशुपालनात अग्रेसर असणारे जिल्हे म्हणून कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांची ओळख आहे. राज्य सरकार 2022-23 या वर्षांमध्ये 5200 बायोगॅस संयंत्रे उभी केली जाणार आहेत. याच्या अंतर्गत 1 घनमीटर पासून 20 ते 25 घनमीटर पर्यंतचे बायोगॅसच्या सयंत्राची उभारणी केली जाऊ शकते यामध्ये 1 घनमीटर च्या बायोगॅस संयंत्रासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 9800 रुपयांपर्यंत तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 17000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
याप्रमाणे 20 ते 25 घनमीटर बायोगॅस संयंत्रासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 52,800 तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 72000 रुपयांपर्यंत पर्यंत अनुदान दिले जात आहे. याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत बायोगॅसला शौचालय जोडले तर अतिरिक्त 1600 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. याच्याच अनुषंगाने 2022-23 मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 2500 शौचालय बायोगॅस बरोबर जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पशुपालन करणारे जिल्हे म्हणून कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याकडं पहिल जातं. आणि त्यामुळेच पुणे कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांना मोठा लक्षांक देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी 897, याच प्रमाणे पुणे जिल्ह्यासाठी 505 तर अहमदनगर जिल्ह्यासाठी 474 एवढे मोठे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत केली जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही प्रकारे फॉर्म भरू शकता. आपल्याला जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या गावातील ग्रामसेवकाशी संपर्क साधू शकता. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर त्याची माहिती संग्रहित करून आपल्याला पुढे संपर्क केला जाईल. पुढे आपल्याला योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया पार पाडून अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
साधारणपणे साडेचार हजार बायोगॅस संयंत्र सर्वसाधारण प्रवर्गाला दिले जाणार आहेत. तर 900 आणि 700 बायोगॅस संयंत्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी दिली जाणार आहेत. अशी एकूण 5200 बायोगॅस सयंत्र 2022-23 मध्ये महाराष्ट्रामत उभी केली जाणार आहेत. स्वच्छ इंधन त्याचबरोबर चांगलं शेणखत असा एक पूरक व्यवसाय म्हणून आपण पशुपालना बरोबर करू शकता.
ज्याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहन म्हणून अनुदान देखील दिल जात. आपण जर इच्छुक असाल तर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.