शेतीशिवार टीम : 3 ऑगस्ट 2022 :- राज्यात महात्मा फुले मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. आणि या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित (MPBCDC) च्या सबसाईड्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा फुले रिलायबल एनर्जी अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड (Mahatma Phule Renewable Energy & Infrastructure Technology Limited) अर्थात महाप्रीतच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकरता निर्धूर चूलचे (Biomass stove) मोफत वाटप करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत…
2014 पासून देशांमध्ये उन्नत चुल्हा ही योजना राबवली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसून त्याची अंमलबजावणी झाली नाही. मात्र आता याच योजनेसाठी 2022 करता अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील पात्र रहिवाशांकडून महाप्रीतच्या माध्यमातून या पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धुर चूलीच्या मोफत वाटप करता अर्ज मागवण्यात आले आहेत.
निर्धुर चूलीसाठी पात्रता :-
लाभार्थी हा अनुसूचित जातीचा असावा.
लाभार्थ्याकडे एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन नसावे.
लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. 1,12,000 /- किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
निर्धुर चूलीसाठी किती मिळेल अनुदान :-
निर्धुर चूलीसाठी 100% अनुदानावर म्हणजे फ्री निर्धुर चूल मिळणार आहे.
या निर्धुर चूलीची (Biomass stove) साधारणपणे किंमत 4 ते 5 हजारापर्यंत असणार आहे.
अर्ज कसा आणि कुठे कराल ?
अर्ज करण्यासाठी सर्व 36 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी 15 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करावा….
या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी तालुका – जिल्हा स्तरावरील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अर्थात (MPBCDC) च्या कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज कसा कराल ?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://maha-diwa.vercel.app/ या वेबसाइटला भेट दया..
यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पत्ता, तालुका, जिल्हा, इत्यादी माहिती व्यवस्थित भरा अन् अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरा.
अधिक माहितीसाठी https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.