ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा । साखर हंगाम 2022-23 साठी उसाला ‘इतका’ FRP दर जाहीर, पहा…

0

शेतीशिवार टीम : 5 ऑगस्ट 2022 :- राज्यातील जवळजवळ 50 ते 55 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीला (FRP) मंजुरी देण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये उसाच्या या FRP मध्ये 15 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली असून हा FRP आता 2022-23 करता 305 रुपये प्रति क्विंटल दराने म्हणजे 3,050 रुपये प्रति टन असा ठरवण्यात आलेला आहे.

शेतकरी मित्रांनो, रास्त आणि किफायतशीर दर म्हणजे एफआरपी (FRP) ज्याच्यासाठी कमिशनर ऑफ ॲग्रीकल्चर होस्ट अँड प्रायसेसच्या माध्यमातून दरवर्षी शासनाने शेतकर्‍यांच्या दरासंबंधी शिफारस पाठवली जाते. आणि सरकार ऊस नियंत्रण आदेश 1966 च्या अंतर्गत ही FRP निश्चित करत आहे जी 2022-23 करता 3,050 रुपये प्रति टन असे ठरवण्यात आले आहे.

त्याच बरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून उताऱ्याचा बेस रेट आता 10.25% करण्यात आलेला आहे. त्यामुळे देशातील पाच कोटी तर महाराष्ट्रातील जवळजवळ 50 ते 55 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

3,050 रुपये हा भाव 10.25% साखर उतार्याला असणार आहे. त्याच्यापैकी 0.1% कमी किंवा जास्त उतारा झाल्यास त्यासाठी भाव हा कमी-जास्त असेल. परंतु जर उतारा 9.5% च्या खाली घसरला तर भावात आणखी कपात केली जाणार नाही. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना 2022 -23 करता प्रतिटन 2821 रुपये एवढा दर कारखान्याकडून दिला जाणार आहे.

2021 – 22 मध्ये हा दर 2750 रुपये होता. त्याच्यामुळे उतारा जरी कमी आला तरीही शेतकऱ्यांना जास्त यामध्ये परिणाम होणार नाही. याचबरोबर शासन साखर कारखान्यांकडून 24 लाख दशलक्ष टन साखर खरेदी करत होतं. ते आता 2022 -23 साखर हंगामात करतात 36 लाख टन साखर खरेदी करणार आहे आणि याच्या माध्यमातून उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाख 20 हजार कोटी रुपयांचा भक्कम मोबदला शेतकऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी मिळणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आधार दिलासा मिळणार आहे.

साखर हंगाम 2022-23 साठी उसाच्या उत्पादनाची A2 + FL किंमत (म्हणजेच वास्तविक भरलेली किंमत आणि कौटुंबिक श्रमाचे मूल्य) 162 रूपये प्रति क्विंटल आहे. FRP ची 305 रूपये प्रति क्विंटल किंमत 10.25% च्या वसुली दराने उत्पादन खर्चापेक्षा 88.3% जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या किंमतीपेक्षा 50% पेक्षा जास्त परताव्याचे आश्वासन मिळते. साखर हंगाम 2022-23 साठी एफआरपी चालू साखर हंगाम 2021-22 पेक्षा 2.6% जास्त आहे.

केंद्र सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे गेल्या 8 वर्षांत ऊस लागवड आणि साखर उद्योगाने मोठा पल्ला गाठला असून आता या क्षेत्राला स्वयं-शाश्वततेची पातळी गाठण्यात यश आले आहे.

सरकारने योग्य वेळी केलेला हस्तक्षेप तसेच साखर उद्योग, राज्य सरकारे, केंद्र सरकारचे विविध विभाग आणि शेतकरी यांच्यातील सहयोगी संबंधांचा हा परिणाम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.