‘या’ 8 सीटर फॅमिली Car चे दिवाने झाले लोक, कंपनीने विकल्या 10 लाखांहून अधिक गाड्या ; पहा, फीचर्स अन् किंमत…
शेतीशिवार टीम : 5 ऑगस्ट 2022 :- ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाचं वाहन कंपन्यांचे सेल्स रिपोर्ट यायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत बहुतांश कंपन्यांनी वाढ नोंदवली आहे. त्याचप्रमाणे Toyota किर्लोस्कर मोटरने आपल्या प्रीमियम थ्री-रो कारच्या भारतातील विक्रीत प्रचंड वाढ नोंदवली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, इनोव्हा MPV ला आतापर्यंत देशभरात दहा लाखांहून अधिक ग्राहक मिळाले आहेत.
Innova, आता भारतात इनोव्हा क्रिस्टा म्हणून सादर केली गेली आहे, ही देशातील सर्वात जुनी MPV कार आहे. ही कार मोठ्या कुटुंबासाठी ते प्रोफेशनल युजसाठी देखील वापरली जाते.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही त्याच्या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. अलीकडे Kia Carens, MG Hector Plus, Maruti Ertiga सारख्या अनेक मॉडेल्सनी बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, ग्राहकांमध्ये इनोव्हा बद्दलची क्रेझ कायम आहे.
ही MPV भारतीय बाजारपेठेत एकूण 18 व्हेरियंटमध्ये येते, ज्याची स्टार्टींग प्राईस 16.52 लाख रुपये आहे जी टॉप व्हेरियंटसाठी सुमारे 24.59 लाख रुपयांपर्यंत जाते. याशिवाय, ही थ्री -रो MPV ग्राहकांना वेगवेगळे सीटिंग लेआउट्स देखील देते, सीटिंग अरेंजमेंटचा विचार केल्यास, ही कार 8 सिटांसह देखील उपलब्ध आहे.

Toyota Innova Crysta चे प्रमुख फीचर्स :-
टोयोटाच्या या MPV चे नवीनतम मॉडेल कंपनीने 2016 ऑटो एक्स्पोमध्ये प्रथमच प्रदर्शित केले होते आणि इनोव्हाला इनोव्हा क्रिस्टा असे नाव दिले होते. मागील मॉडेलच्या तुलनेत हे आकाराने मोठे आहे, जे केबिनच्या आत चांगली जागा देते. तिची लांबी 4735 mm, रुंदी 1830 mm आणि उंची 1795 mm आहे, याशिवाय कारला 2750 mmचा शानदार व्हीलबेस मिळतो.
न्यू Innova मध्ये, कंपनीने 2.4-लिटर क्षमतेचे 2GD FTV 4 सिलेंडर डिझेल इंजिन वापरलं आहे, जे 150PS पॉवर आणि 360Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, पेट्रोल व्हेरियंटमध्ये 2.7-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 166PS पॉवर आणि 245Nm टॉर्क जनरेट करते. साधारणपणे ही कार 12 ते 15 kmpl चा मायलेज देते. विशेष बाब म्हणजे हे 7 सीटर आणि 8 सीटर अशा दोन्ही लेआउटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत 17.86 लाख ते 26.54 लाख रुपये आहे.
हे आहेत प्रोफेशनल फीचर्स :-
नेक्स्ट जेनरेशनल इनोव्हा क्रिस्टाचा आतील डॅशबोर्ड व्हुडन इन्सर्ट आणि ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने सजलेला आहे. मोठी 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, पॉवर विंडो, इल्यूमिनेशन लॅम्प आणि सेफ्टीच्या दृष्टीने, टॉप-ॲड व्हेरियंटमध्ये 7 एअरबॅग्ज मिळतील तर ABS, EBD, ब्रेक असिस्ट आणि ड्युअल-एअरबॅगने सुसज्ज आहे.