शेतीशिवार टीम : BSF HC RO RM Recruitment 2022 : सीमा सुरक्षा दल (BSF) हेड कॉन्स्टेबल (HC) पदांसाठी 1312 रिक्त जागा भरणार आहे. हेड कॉन्स्टेबल (Radio operator) साठी एकूण 982 जागा उपलब्ध आहेत आणि उर्वरित 330 जागा हेड कॉन्स्टेबल (Head Constable) पदांसाठी रिक्त जागा आहे.

पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार BSF HC भर्ती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक 20 ऑगस्ट 2022 पासून rectt.bsf.gov.in वर उघडली जाणार आहे.

उमेदवारांनी 28 सप्टेंबर 2022 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 4 मध्ये रु. 25500 ते रु 81100 या वेतनश्रेणीत भरती करण्यात येणार असून पात्र तरुण – तरुणींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या तारखा :-

BSF HC अर्जाची सुरुवातीची तारीख – 20 ऑगस्ट 2022

BSF HCA अर्जाची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2022

शैक्षणिक पात्रता :-

हेड कॉन्स्टेबल (Radio operator) पदांसाठी :-

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा आणि 2 वर्षे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इंस्टीट्यूट (ITI) रेडिओ / टेलिव्हिजन / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट / डेटा एंट्री / कॉम्प्युटर सॉफ्टवेअर / जनरल इलेक्ट्रॉनिक्स किंवा डेटा एंट्री ऑपरेटरसह 60% ( PCM ग्रुप) गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा.

हेड कॉन्स्टेबल (Radio Mechanic) पदांसाठी :-

मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण किंवा रेडिओ आणि टेलिव्हिजन किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा डेटा एंट्री आणि संगणक सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिट किंवा इन्फो टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स किंवा कॉमन इक्विपमेंट मेंटेनन्स किंवा कॉमन इक्विपमेंट मेंटेनन्स किंवा कॉम्प्युटर हार्डवेयर मधून 2 वर्षाचे ITI चे सर्टिफिकेट घेतलेला असावा.

किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून नेटवर्क टेक्निशियन किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा डेटा एंट्री ऑपरेटर किंवा 60% गुणांसह 12 वी PCM उत्तीर्ण असावा.

वय मर्यादा :-

उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे.

पगार :-

निवड झालेल्या उमेदवारांना 25500 रुपये ते 81100 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

नोटिफिकेशन पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *