भारताला सण – उत्सवांचा देश म्हटलं जातं. येथे लोकांना देव देवतांच्या पूजेसाठी, प्रत्येक सुख :- दुख : प्रसंगी ताज्या फुलांची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत, फुलांच्या व्यवसायापासून प्रचंड नफा कमवला जाऊ शकतो, ही कल्पना तुम्हाला कधी सुचलीये का ? आपण याच व्यवसायबद्दल जाणून घेणार आहोत…

आजकाल बर्‍याच लोकांना नोकरी आणि धकाधकीच्या जीवनामुळे कंटाळा आला आहे. अशा परिस्थितीत, आज बरेच तरुण व्यवसायाकडे वळत आहेत. आज आपण अशी व्यवसाय कल्पना जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये नाममात्र गुंतवणूकीसह बंपर कमाई मिळू शकते.

आपण फुलांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेउयात. हे असे उत्पादन आहे, ज्याची अगदी लहान गावातून मोठ – मोठ्या शहरांपर्यंत मोठी मागणी आहे. जर एखादा कार्यक्रम असेल तर त्याची मागणी आणखी वाढते.

फुलांचा व्यापार जितका अधिक असेल तितका नफा जास्त असतो. कोणीही हा व्यवसाय अगदी सहजरीत्या करू शकतो तेही अत्यंत कमी गुंतवणूकीसह. तसेच जशीजशी कमाई वाढेल तस हा व्यवसाय देखील वाढवता येऊ शकतो.

कसा सुरु कराल हा व्यवसाय :-

फुलांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला 1000 ते 1500 चौरस फूट जागेची आवश्यकता भासेल. यानंतर, फुले ताजे ठेवण्यासाठी फ्रीजची देखील आवश्यकता असते. फुलांचे वितरण करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यता देखील भासू शकते. यात शेतकऱ्यांकडून फुले खरेदी करण्याची देखील आवश्यकता असते त्यासाठी लोक लागतात. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या मागणी असते. अशा परिस्थितीत, आपल्याला अनेक प्रकारचे फुले साठवून ठेवावी लागतात. पुष्पगुच्छ बनवण्यासाठी बर्‍याच साधनांची देखील गरज भासते.

विक्रीसाठी खास धोरण ?

सहसा आपल्या देशातील प्रत्येक घरात सकाळची पूजा- अर्चना असतेच. यासाठी प्रत्येकाला फुलांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत आपण काही लोकांशी संपर्क साधून त्यांना सांगू शकतो की, आपल्याकडे ताजी, सुवासिक फुले मिळतील. जेव्हा त्यांना ताजे, सुवासिक फुले मिळत असतील तर त्यास व्कचीतच कोणी नकार देऊ शकतो. येथेच आपले ग्राहक बनू लागतील. आपण त्यांच्या विक्रीस प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील आधार घेऊ शकता. तसेच आपण सोशल मीडियामध्ये प्रचार करून ऑर्डर मिळवू शकता. इंस्टाग्राम फेसबुकद्वारे मदत देखील घेऊ शकता..

कमाई ?

फुलांच्या किंमती वेगवेगळ्या असू शकतात. गुलाब आणि झेंडूच्या फुलांची किंमत वेगळी असते. जर 50,000 रुपये गुंतवणूक केली गेली तर त्यात चांगला नफा मिळू शकतो. ज्या किंमतीत शेतकऱ्यांकडून फुले खरेदी केली जातात त्याच्या दुप्पट किंमतिने बाजारात विकली जातात.

जर एखादे फुल 3 रुपये किमतीने खरेदी केले गेले असेल तर ते 7-8 च्या रुपांतरीत किमतीने बाजारात सहज विकले जाईल. तसेच खास प्रसंगी हे फूल 10 पेक्षा जास्त किमतीने विकले जाईल. अशा परिस्थितीत, आपण अंदाज लावू शकता की कमाई किती बक्कळ केली जाऊ शकते…

https://agromarathi.com/twosisters-startup-created-houvu-fresh-has-a-turnover-of-crores/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *