भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपल्या सर्वांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. परंतु शेती परवडत नसल्याचे अनेक शेतकरी बांधव सांगत असतात. परंतु जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर शेती नक्की परवडते आणि लाखोंचं उत्पादन सुद्धा घेता येतं, ही किमया करुन दाखवली आहे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील भदोही मधील शेतकरी नजम अन्सारी यांनी..

सध्या शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळले आहे. मागील काही काळांपासून शेतकरी फुलनांच्या लागवडीतून बक्कळ नफा मिळवत आहे. यामध्ये सर्वात पॉप्युलर फुल म्हणजे ते जरबेराचं.. या फुलाला मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे. जरबेराच्या फुलांचा पुरवठा अनेक महानगरांमध्ये केला जातो. पॉली हाऊसमध्ये शेतकरी फुलांची लागवड करत असून, यातून अनेकांना रोजगारही मिळाला आहे. जरबेराच्या फुलांचा वापर लग्नसमारंभ आणि हॉटेलच्या सजावटीसह इतर ठिकाणी केला जातो.

25 गुंठयातच शेतकऱ्याने कमावला 14 लाखांचा नफा..

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील करौदा येथील भदोही येथील रहिवासी नजम अन्सारी यांनी 25 गुंठयात जरबेरा आणि गुलाबाच्या फुलांची लागवड करत आहेत. शक्यतो पॉली हाऊसमध्ये जरबेरा फुलाची लागवड केली जाते..

जरबेरा उत्पादक नजम अन्सारी यांनी सांगितले की, येथील हवामान जरबेरासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. आम्ही वाराणसी, प्रयागराज, कानपूर आणि लखनौला टेम्पोमधून फुले पाठवतो. जेथून व्यापारी उचल घेतात. त्यांनी सांगितले की, जरबेरा फुलांच्या तुकड्यानुसार विकला जातो. लग्नसराईच्या काळात एका फुलाची किंमत 10 ते 12 रुपयापर्यंतही पोहचते. अशा परिस्थितीत त्यांनी पहिल्याच वर्षी तब्बल 20 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवलं आहे.


प्रत्येक फूल अनमोल आहे. पॉली हाऊसमध्ये जरबेरा फुलांची लागवड ठराविक तापमानात केली जाते. जरबेराची लागवड करून शेतकरी समृद्ध होत आहेत. शेतकरी नजम अन्सारी यांनी सांगितले की, जरबेराची लागवड काही वर्षांपूर्वी केली जात होती, तिथे आता भरपूर नफा मिळत आहे. पॉली हाऊस केअर अंतर्गत त्याची लागवड केली जाते.

थंडीच्या काळात त्याचे उत्पादन फारच कमी होते, जेथे केवळ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात पॉली हाऊसमध्ये त्याची चांगली लागवड करता येते.

15 ते 20 दिवस फुले राहतात ताजे – तवाने

जरबेराचे फूल दिसायला अतिशय आकर्षक आहे. त्याच्या रंगीबेरंगी पाकळ्या डोळ्यांना पूरक आहेत जरबेराच्या फुलांचा वापर लग्न समारंभाच्या सजावटीसाठी, पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी, कार्यालये, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सच्या सजावटीसाठी केला जातो. यासोबतच याचा उपयोग आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठीही होतो.

या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याच्या बाटलीत ठेवल्यास ते दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ हिरवे राहते. हे फूल 12 महिने उपलब्ध असते, जिथे पिवळे, केशरी, पांढरा, गुलाबी, लाल आणि इतर रंग असतात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *