Take a fresh look at your lifestyle.

PM किसानचा 10वा हप्ता उद्या येऊ शकतो का ? 16 डिसेंबरला नरेंद्र मोदी 5000 शेतकऱ्यांना करणार ऑनलाइन संबोधित…

0

शेतीशिवार टीम,15 डिसेंबर 2021:- PM Kisan 10th Instalment : पीएम किसान सन्मान निधीचा 10वा हप्ता कधी येणार ? आजकाल खेड्यापाड्यात, चहाच्या टपऱ्यांवर शेतकऱ्यांमध्ये ही चर्चा सर्रास दिसून येत आहे. पूर्वी लोकांना वाटत होते की, डिसेंबर-मार्चचा हप्ता 15 डिसेंबरला येईल, पण एफटीओ (FTO) तयार न झाल्यामुळे हे प्रकरण प्रलंबित आहे. परंतू आता असं अनुमान लावलं जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 डिसेंबरला म्हणजेच उद्या 10वा हप्ता रिलीज करू शकतात.

अनुमान लावण्याचं कारण म्हणजे, 16 डिसेंबर रोजी गुजरात सरकारने नैसर्गिक शेती पद्धतींवर आयोजित केलेल्या कृषी कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला ते मोदी स्वतः ‘ऑनलाइन’ संबोधित करणार आहे.

या कार्यक्रमात सुमारे 5,000 शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत पीएम किसानचे पैसे गुरुवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकारने अद्याप अशी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.

गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले होते. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 18 हजार कोटी रुपयांचा निधी जारी केला होता.

पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणून देशातील नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. यानंतर 31 मार्च 2021 पर्यंत या हप्त्याअंतर्गत 10,23,49,443 लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत.

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये थेट ट्रान्सफर करते. आतापर्यंत सरकारने 9 हप्ते जारी केले असून 12 कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकरी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ई-केवायसी E-KYC अनिर्वाय केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.