Take a fresh look at your lifestyle.

Farmers ID News : शेतकऱ्यांना लवकरचं मिळणार Unique ID कार्ड ; जाणून घ्या खासियत

0

शेतीशिवार टीम,15 डिसेंबर 2021:- देशातील शेतकऱ्यांसाठी युनिक आयडेंटिटी कार्ड (ID) बनविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

लोकसभेत पी वेलुसामी आणि के शनमुग सुंदरम प्रश्न केला होता की, शेतकऱ्यांसाठी युनिक (ID) बनवण्याची सरकारची कल्पना आहे का ? या प्रश्नावर उत्तर देताना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली आहे.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांसाठी खास ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून सुरू आहे. शेतकऱ्याचे युनिक (ID) त्या सर्व कृषी योजनांशी जोडले जाईल, ज्याचा लाभ शेतकऱ्याने घेतला आहे.

त्याचे फायदे स्पष्ट करताना ते म्हणाले की, e-Know Your Farmer (E-KYF) द्वारे शेतकर्‍यांचे व्हेरिफिकेशन करण्याची तरतूद आहे ज्यात विविध योजनांतर्गत लाभ मिळवण्यासाठी विविध विभागांना प्रत्यक्ष कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही.

तोमर म्हणाले की यामुळे क्षेत्र-आधारित आणि सानुकूलित सल्ला सुलभ होईल आणि याद्वारे प्रतिकूल हवामानामुळे पिकाच्या नुकसानीचे मूल्यांकन करणे सोपे होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.