शेतीशिवार टीम, 19 जुलै 2021 :- राज्य मंडळाचा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल 99.95 टक्के लागला असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती.आता त्यानुसार CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी येत्या 19 जुलै म्हणजेच आज सुरु होतं आहे.
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी CET परिक्षेची आता वाट पाहत असताना आता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख आणि डिटेल वेळापत्रक आज जाहीर झाले आहे.
11 वी साठी CET परीक्षा शनिवारी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. पेपर 2 तासांचा असून सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही CET परीक्षा होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन असणार आहे.
तसेच राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे.
एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात इंग्रजी (English), गणित (Maths), विज्ञान (Science) आणि सामाजिक शास्त्र (Social Science) या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत.