शेजारी रश्मी ठाकरे,भर पावसात स्वतः ड्रायव्हिंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूर कडे रवाना

0

शेतीशिवार टीम, 19 जुलै 2021 :- आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसात स्वतः गाडी चालवत पंढरपूरच्या दिशेने सपत्नीक रवाना झाले.

त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरला विठ्ठलाची पूजा करणार आहेत. 20 जुलैला म्हणजेच मंगळवारी आषाढी एकादशी असल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला रवाना झाला आहे.

मुंबईत कोसळता पाऊस आणि खराब हवामान यामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाणं शक्य नसल्याने मुख्यमंत्री स्वतः ड्राईव्ह करतच पंढरपूरला निघाले आहेत. गेल्या वर्षीही ते स्वतः ड्राईव्ह करत पंढरपूरला कारनेच गेले होते. यावर्षीही ते पुन्हा एकदा आपल्या कारनेच पंढरपूरला रवाना झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.