शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत हे तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात शहीद झाले आहेत. भारतीय वायुसेनेने ट्विट करून सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हौतात्म्याची पुष्टी केली आहे. CDS जनरल बिपिन रावत यांच्या पत्नीचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व नेत्यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे…
तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी हवाई दलाचं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हॅलिकॉप्टर क्रॅश झालं. हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत, त्यांची पत्नी यांच्यासह 14 जण होते. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या अपघातात 14 जणांचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टरला लागलेल्या आगीमुळे मृतदेह जाळले होते. अशा परिस्थितीत मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्ट चाचणी जाणार आहे.
CDS बिपिन रावत यांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचं हॅलिकॉप्टर तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ कोसळले. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात घडल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
IAF चे Mi-17VH हॅलिकॉप्टर क्रॅश झाले असून अपघाताचे कारण शोधण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आले आहेत. कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई दलाच्या तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि हॅलिकॉप्टरमध्ये 14 जण असल्याचे संकेत दिले. टेलिव्हिजनवर दाखवलेल्या फुटेजमध्ये, क्रॅश झालेल्या हॅलिकॉप्टरमधून ज्वाळा उठताना दिसत आहेत. मात्र, मानवी वस्तीपासून दूर हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. भारतीय हवाई दलाच्या हॅलिकॉप्टरचे नुकसान झालेले आणि जळलेले तुकडे अपघाताच्या ठिकाणी विखुरले होते.
स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी एका तमिळ टीव्ही चॅनेलला सांगितले की, त्यांनी एक मोठा आवाज ऐकला, वरवर पाहता अपघाताचा आवाज, आणि हेलिकॉप्टरला नंतर आग लागली आणि त्यात काही प्रवासी गंभीर भाजले.
CDS जनरल रावत हे वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस कॉलेजमध्ये जात होते. निलगिरी जिल्ह्यातील डोंगराळ भागात कुन्नूरजवळील कटेरी-नांजप्पानाचाथिरम भागात हेलिकॉप्टर कोसळलं.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोईम्बतूरमधील सुलूर येथून वेलिंग्टनमधील डीएससीकडे जात होते, जेथे जनरल रावत, लष्करप्रमुख एमएम नरवणे यांच्यासमवेत नंतर एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.