Viral Video: नवऱ्याच्या हातात हार अन् तितक्यात प्रियकराची एन्ट्री, भरमंडपात नवरीच्या भांगेत सिंदूर भरलं !
शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : फिल्म अन् टीव्ही सिरीयल मध्ये दाखवणारा मूर्खपणा लोकांचे मन कसं बिघडवते, याच अत्यंत ताज उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील गोरखपूर मध्ये घडलेला हा लज्जास्पद प्रकार होय.
या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा असून या व्हिडीओमध्ये एक विवाह सोहळा पार पडत असल्याचं दिसतंय. नेमकं लग्नातच नवरीचा एक प्रेमभंगी प्रियकर स्टेजवर पोहोचतोय अन् आणि नवरीच्या भांगेत जबरदस्तीने सिंदूर भरल्याचा दिसून येत आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, बुदहट परिसरात एक लग्न सुरू होतं. 1 डिसेंबर रोजी. अचानक एक तरुण येथे आला आणि त्याने वधूच्या भांगेत जबरदस्तीने सिंदूर भरलं. नवरीने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्यानं तर खिश्यातुन मूठभर कुंकू काढून तिच्या तोंडाला लावलं.
वधूच्या भांगेत बळजबरीने सिंदूर लावणाऱ्या तरुणाच्या तोंडावर मफलर होती. बळजबरीने सिंदूर लावणारा हा तरुणीचा माजी प्रियकर असल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी तो कामानिमित्त शहराबाहेर गेला होता.
🇮🇳 Jilted lover forcibly applies sindoor in bride's 'manng' during 'jaimala' at her wedding. #india #mostshared pic.twitter.com/qbVOD9EHHK
— Imminent Global News (@imminent_news) December 6, 2021
यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे निश्चित केले. जेव्हा मुलाला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने आपले प्रेम फिल्मी पद्धतीने व्यक्त करण्याचा निर्णय घेतला अनं भ्रमंडपात असं लाजिरवाणं कृत्य केलं.