Take a fresh look at your lifestyle.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हेलिकॉप्टर क्रॅश ; 11 जणांचा होरपळून मृत्यू , CDS जनरल बिपिन रावत यांची प्रकृती गंभीर, पहा व्हिडीओ..

0

शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : तामिळनाडूतील कन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे . घनदाट जंगलात झालेल्या या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे 14 अधिकारी होते. आतापर्यंत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ते गंभीररित्या जळालेले आहेत…

अपघातानंतर सुमारे तासाभरानंतर जनरल रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. जनरल बिपिन रावत यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला आहे.

हेलिकॉप्टरमध्ये लष्कर टीमसह जनरल बिपिन रावतसह पत्नीचा समावेश :-

1. जनरल बिपिन रावत
2. मधुलिका रावत
3. ब्रिगेडियर एलएस लिडर
4. लेफ्टनंट के. हरजिंदर सिंग
5. नायक गुरसेवक सिंग
6. नायक. जितेंद्र कुमार
7. लान्स नाईक विवेक कुमार
8. लान्स नाईक बी. साई तेजा
9. हवालदार सतपाल

ANI या वृत्तसंस्थेनुसार, हेलिकॉप्टर सुलूर एअरबेसवरून वेलिंग्टनला जात होते. घटनास्थळी डॉक्टर, लष्कराचे अधिकारी आणि कोब्रा कमांडोचे पथक उपस्थित आहे. जळालेले मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डोंगराच्या पायथ्याशी आणखी काही मृतदेह पडले आहेत.अपघाताच्या व्हिज्युअल्समध्ये हेलिकॉप्टर पूर्णपणे खराब झालेले दिसत आहे आणि त्याला आग लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.