Take a fresh look at your lifestyle.

शिक्षकी पेशाला काळिमा ! मुख्याध्यापकसह 3 शिक्षकांचा विद्यार्थिनीवर गँगरेप ; महिला शिक्षिकांनी बनवला व्हिडिओ !

0

शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : देशात दररोज सामूहिक बलात्काराच्या घटना असतात.अशा घटना ऐकून प्रत्येकाचं मन हेलावून जातं. जसं की शाळकरी मुलीचा शिक्षकाने बलात्कार केला. परंतु यापेक्षा अशीच एक भयंकर घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रायसरना येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाळेच्या मुख्याध्यापकासह 4 शिक्षकांनी 10 वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

गरीब घरातील मुलीला परीक्षा पास करून फी माफ करण्याचे सांगून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर दोन महिला शिक्षकांनीही या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अल्पवयीन मुलीने जेव्हा तिच्या वडिलांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक आणि तीन शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले तेव्हा वडिलांची पायाखालची जमीनच सरकली.

सविस्तर माहिती अशी की, शाळेतील दोन महिला शिक्षिकांनी तिला मोफत ड्रेस, कॉपी आणि पुस्तक देण्याचे आमिष दाखवून फी भरण्याचे आमिष दाखविल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. नंतर ती त्याला शाळेजवळ राहणाऱ्या शिक्षकाच्या घरी घेऊन गेली.

तिथे शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर दोन शिक्षक आधीच दारू ढोसत होते. तेथे गेल्यानंतर एका महिला शिक्षिकेने तिचे कपडे काढले. त्यानंतर चारही पुरुष शिक्षकांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान दोन्ही महिला शिक्षिकानी त्या मुलीचे व्हिडिओ बनवले.

शिक्षकांच्या या घृणास्पद कृत्याला विरोध केल्यावर तिला नापास करण्याची धमकी देण्यात आली आणि व्हिडिओ व्हायरल केला, असे मुलीचं म्हणणं आहे. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तिच्यावर महिला शिक्षिकेच्या पतीसह इतरांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेने वडिलांच्या मदतीने पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक जितेंद्र कुमार, राजीव यादव सतीश कुमा सुरेश मीणा,शिक्षिका – अनीता कुमारी मनीषा यादव व सुनीता यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीशिवाय आणखी तीन विद्यार्थिनींनी या शाळेतील शिक्षकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एक मुलगी सहावीत, दुसरी चौथीत आणि तिसरी मुलगी तिसरीत शिकते. गेल्या वर्षी याच शाळेतील आणखी एका शिक्षकाविरुद्ध असाच गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.