Take a fresh look at your lifestyle.

मंत्री प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर ; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा !

0

शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : दिल्लीत राष्ट्रवादीची हाय लेव्हल बैठक सुरु असताना मात्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची ED ने चौकशी केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता ईडी कार्यालयात तनपुरे यांच्या चौकशीला सुरुवात झाली होती. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.

त्यामुळे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहनमंत्री अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांच्या चौकशीनंतर आता प्राजक्त तनपुरे यांच्या मागेही ED चा ससेमिरा लागला आहे. यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.

त्यामुळे ठाकरे सरकारमधील अजून एक मंत्री आता ईडीच्या रडारवर आहे. आता यावरच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. 100 कोटीची संपत्ती 13 कोटीत दिली गेली. तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन केली.

प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर असून त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

तसेच शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीनं प्राजक्त तनपुरे यांच्याद्वारे रामगणेश गडकरी साखर कारखाना काबीज केला. त्याचे पुरावे बाहेर आले आहेत, त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.