शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : मंगळवारी सलग दोन ट्रेडिंग सत्रांत शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला. BSE सेन्सेक्स 886.51 अंकांनी वाढून 57,633.65 वर बंद झाला. NSE निफ्टी 264.45 अंकांनी उसळी घेत 17,176.70 वर बंद झाला.
तज्ञांच्या मते, Omicronच्या अभ्यासात Covid-19 चे नवीन स्वरूप समोर आल्यानंतर जागतिक शेअर बाजारांना थोडा दिलासा मिळाला आहे. अभ्यासात असं म्हटलं आहे की, Omicron वेगाने पसरत असला तरी त्याचा डेल्टा स्वरूपाच्या तुलनेत प्रभाव सौम्य आहे.
निफ्टीबद्दल Chartviewindia.in चे मजहर मोहम्मदचं म्हणणं आहे की, गेल्या काही सत्रातील प्राइस एक्शन वरून असं दर्शवते की, निफ्टी एक हाई वोलेटाइल फेज मध्ये एंटर केलं आहे. त्याठिकाणी एक दिवसाची मोठी दिशात्मक चाल आकर्षित करण्यात अयशस्वी ठरतात…
आज या शेअर्समध्ये पाहायला मिळेल तेजी :-
आज बुधवारी येस बँक (Yes Bank) , उर्जा ग्लोबल (Energy Global) , हिंदाल्को (Hindalco), हिंदुस्थान कॉपर (Hindustan Copper) आणि अँक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये (Axis Bank) वाढ होऊ शकते.
दुसरीकडे, जेपी असोसिएट्स( JP Associates),
बायोकॉन(Biocon), ऑरम प्रॉपटेक (Arum Proptech), सिंजीन (Syngin) आणि इलेकॉन (Elecon) यांच्या शेअर्समध्ये घसरण होण्याची शक्यता आहे.
खरेदी आणि विक्रीसाठी (Buying and selling) कोणते आहेत संकेत :-
आज टोरेंट पॉवर, होम फर्स्ट फायनान्स, बीएसई, तान्ला सोल्युशन्स, ब्राइटकॉम ग्रुप आणि अदानी गॅसच्या शेअर्सची जोरदार खरेदी होऊ शकते. याचे कारण म्हणजे गेल्या ट्रेडिंग सत्रात हे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर गेले होते.
दुसरीकडे, महानगर गॅस, ल्युपिन आणि व्हर्लपूल इंडिया यांना विक्रीच्या दबावाला सामोरे जावे लागू शकते कारण ते मागील ट्रेडिंगमध्ये 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत.