Take a fresh look at your lifestyle.

मधुमेहावर 100% नियंत्रण मिळवायचं असेल तर ‘हे’ 6 आयुर्वेदिक उपाय करून पहा…

0

शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : आजच्या काळात मधुमेह (Diabetes) खूप वेगाने पसरत चालला आहे. मधुमेह होण्यासाठी आजकाल कोणतीही वयोमर्यादा महत्त्वाची नसते.विशेष म्हणजे हे वृद्ध, तरुणांसह लहान मुलांमध्ये देखील पाहायला मिळत आहे.रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य प्रमाणापेक्षा जास्त असल्याने मधुमेहाची स्थिती उद्भवते. आतापर्यंत या आजारावर कायमस्वरूपी इलाज सापडलेला नाही. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे हाच उत्तम उपाय आहे. यासाठी आहारासोबतच जीवनशैलीतही बदल करावे लागतील. घरगुती उपायांनी मधुमेह बऱ्याच अंशी आटोक्यात ठेवता येऊ शकतो. आज आम्ही असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करून निरोगी आयुष्य जगू शकता.

चला जाणून घेऊया मधुमेहावर 100% नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती उपाय :-

कारलं :- 
कारलं हे मधुमेह नियंत्रित करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, कारल्यामध्ये केराटिन नावाचे रसायन असते जे रक्तातील साखर शोषून घेण्याचे काम करते,यामुळे ते नैसर्गिक स्टिरॉइड म्हणून वापरले जाते. त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कारल्याचा 100 मिली रस त्याच प्रमाणात पाण्यात मिसळून दिवसातून तीन वेळा सेवन केल्यास फायदा मिळू शकतो.

2. मेथी:-

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने ग्लुकोजचे लेव्हल कमी होते आणि मधुमेहापासून आराम मिळतो.यासाठी तव्यावर मेथीदाणे भाजून त्याची पावडर बनवा. ही पावडर डब्यात ठेवा.आणि हे नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी एक चमचे कोमट पाण्यात मिसळून सेवन करा. याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित राहते.

3.जांभूळ:-

जांभूळचा रस, पाने आणि बिया हा मधुमेह बरा करण्यासाठी खूप कार्यरत आहे.जांभूळच्या वाळलेल्या बिया बारीक करून पावडर बनवा,आणि एक चमचाभर दिवसातून दोनदा पाणी किंवा दुधासोबत घ्यावं. याच्या नियमित सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो.

4.आवळा:-

आवळ्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण जर तुम्ही एक चमचा आवळ्याच्या रसात कारल्याचा रस मिसळून नियमितपणे सेवन केले तर मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा हा सर्वात प्रभावी उपाय असू शकतो.

5.आंब्याची पाने:-

15 ग्रॅम ताजी आंब्याची पाने 250 ग्रॅम पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी गाळून प्या. याशिवाय आंब्याची वाळलेली पाने बारीक करून चूर्ण बनवून खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते.

6.मधुमेहर पावडर:-

आंबा, जामुन, गुळाची पाने, बेलची पाने आणि बेलाचं फळ समान प्रमाणात बारीक करून पावडर बनवा.आता ही पावडर सुरक्षित एका डब्यात ठेवा आणि दररोज एक चमचा 100 ग्रॅम कारल्याचा रस घ्या.याचे नियमित सेवन केल्याने साखरेची पातळी 100% नियंत्रित राहते.तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आयुर्वेदिक औषध दुकान, मेडिकलमध्ये हे बनवलेली पावडर उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.