शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : दिल्लीत राष्ट्रवादीची हाय लेव्हल बैठक सुरु असताना मात्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची ED ने चौकशी केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहनमंत्री अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांच्या चौकशीनंतर आता प्राजक्त तनपुरे यांच्या मागेही ED चा ससेमिरा लागला आहे. यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढले आहे.
काल तनपुरे यांना ED ने समन्स धाडून 1 वाजता चौकशीसाठी बोलावलं ते हजरही राहिले परंतु ED ची मिटिंग चालू असल्याने 3 वाजता त्यांची चौकशी सुरु केली ती तब्बल 8 तास सुरु राहिली.
नेमकं काय आहे प्रकरण :-
महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेने ज्या कारख्यान्यांना कर्जे दिली होती त्यात अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे. हे कर्ज दिल्यानंतर पुढे सन 2012 मध्ये या कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला.
या कारखान्याची मूळ किंमत होती 26 कोटी रुपये. मात्र असे असतानाही तनपुरे यांच्या कंपनीने हा कारखाना फक्त 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता. याच व्यवहारावर ईडीला संशय आहे. म्हणूनच ED ने तनपुरे यांची चौकशी केली आहे.
कोण आहेत प्राजक्त तनपुरे :-
प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे भाचे आहेत. प्राजक्त तनपुरे हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याचे आमदार आहेत. सध्या ठाकरे सरकारमध्ये ते नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्य मंत्रीपद भूषवत आहेत.