शेतीशिवार टीम, 29 डिसेंबर 2021 : ‘जाने मेरी जानेमन, बसपन (बचपन का प्यार)’ या गाण्याने प्रसिद्ध झालेल्या सहदेव दिर्दोची प्रकृती आता सुधारत आहे. मंगळवारी रात्री सहदेव शुद्धीवर आल्याचे सांगण्यात येत आहे.
सहदेव याचा मंगळवारी अपघात झाला, त्यात तो जखमी झाला. तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गायक- रॅपर बादशाह ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सहदेवच्या मदतीसाठी पुढे आले. यासोबतच सोशल मीडियावरही सहदेवसाठी अनेक पोस्ट करण्यात आल्या होत्या.
सहदेव आला शुद्धीवर…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सहदेव यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तो शुद्धीवर आला. पूर्वीपेक्षा परिस्थिती चांगली असली तरी तब्येत सुरळीत व्हायला वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सहदेव धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडल्यापासून ते उपचार होईपर्यंत सहदेव सुमारे 5 तास बेशुद्धावस्थेत होता.
डॉक्टरांनी सांगितले की, सहदेव आता बोलू शकतो. त्याचा सीटी स्कॅन व अन्य टेस्ट करण्यात आल्या आहेत. प्रकृती सुधारत असल्याने त्याला रायपूर वा विशाखापट्टनमला हलवण्याची गरज नाही.
बादशाहचं ट्विट…
सहदेव लवकर बरा व्हावा यासाठी सोशल मीडियावर सर्वजण प्रार्थना करत आहेत. त्याचवेळी बादशाहनेही सहदेवबद्दल ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘मी सहदेव यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या संपर्कात आहे.
तो बेशुद्ध आहे. रुग्णालयात नेले जात आहे. मी त्याच्यासाठी तिथे आहे. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. बादशाहच्या या ट्विटवर चाहतेही सतत प्रतिक्रिया देत होते.
In touch with Sahdev’s family and friends. He is unconscious, on his way to hospital. Im there for him. Need your prayers 🙏
— BADSHAH (@Its_Badshah) December 28, 2021